आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत ७६ जोडपी विवाहबद्ध, विदेशातील वऱ्हाडींचीही उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - संबोधी अकादमी व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित २० व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात रविवारी (दि.दोन) ७६ जोडपी विवाहबद्ध झाली. जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या या सोहळ्यास हजारो वऱ्हाडींसह देश -विदेशातील मान्यवर उपस्थित होते. 


वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्टच्या जाॅईन्ट सेक्रेटरी मिथीला चौधरी, माजी न्यायमूर्ती सी.एल.थूल, आ.डाॅ.राहुल पाटील, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, नितीन गजभिये (नागपूर), बार्टीचे महासंचालक कैलास कणसे (पुणे), निवृत्त अतिरिक्त महासंचालक सदानंद पाटील, डाॅ.पोंचाई पालवधम्मो, तहसीलदार विद्याचरण कडवकर, समाजकल्याण आयुक्त तेजस माळवदकर, सिद्धार्थ हत्तीअंबीरे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंभीरे यांनी संबोधीचा हा उपक्रम म्हणजे बौद्ध धम्माचे कृतिशील पालन असल्याचे नमूद करीत सतत २० वर्षे सोहळ्याचे आयोजन करताना प्रसंगी कर्ज काढले, परंतु विवाह सोहळा बंद होऊ दिला नसल्याचे सांगितले.  मिथिला चौधरी यांनी संबोधीचा हा विवाह सोहळा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. वल्ड अलायन्स आॅफ बुद्धिस्टचे उपाध्यक्ष सब्ज बरुआ यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. माजी न्यायमूर्ती सी.एल.थूल यांनी भगवान गौतम बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी अकादमी सातत्याने प्रयत्नशील असून या माध्यमातून संबोधीने समाजात परिवर्तनाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार काढले. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, आ.डाॅ.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ममता पाटील यांनी केले. भगवान जगताप यांनी आभार मानले.