आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंतूरमध्ये दोन घटनांत 2 बालकांचा मृत्यू, एकाचा तलावात पडून तर दुस-याचा मृतदेह आढळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिंतूर शहरातील बोर्डीकर महाविद्यालयाचा परिसरात अंदाजे आठ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. तर तालुक्यातील जांब खु येथील दहा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी(दि.२०) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.

 

तालुक्यातील जांब खु येथील आदित्य विलास पिंपळकर (वय१०)  मोहरमनिमित्त आपल्‍या दोन-तीन मित्रांसह परिसरातील देवस्थान ढगे बुवा येथे धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथून परत येत असताना पाणी फाऊंडेशनचा माध्यमातून करण्यात आलेल्या गाव तलावात पोहण्यासाठी ते उतरले. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य हा गाळात फसला. इतर मुलांनी आरडाओरड करत गावातील ग्रामस्थांना बोलावले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून आदित्यला पाण्याच्या बाहेर काढले. परंतू तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी पंचनामा करुन मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आणला. अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल इनामदार हे करीत आहेत.


दुस-या घटनेत जिंतूर शहरातील शंकुतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयाच्या  संरक्षण भिंतीच्या मागे दहा वर्षाचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्‍याच्‍या डोक्‍याला गंभीर दुखाप झाली होती. काही नागरिकांनी त्‍याला पाहिल्यानंतर त्यांनी जिंतूर पोलीस ठाण्याचे फौजदार सोनाजी आमले यांना दुरध्वनीद्वारे घटनेची माहिती कळविली. त्यांनी तातडीने त्या मुलाला जिंतूर शासकीय रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्‍याला मृत घोषित केले. युवराज अशोक जाधव(वय १० रा.शिवाजीनगर जिंतूर) असे या बालकाचे नाव आहे. परंतू त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...