आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Reference To The Jia Khan Suicide Case, Suraj Pancholi Said 'I Was Kept In The Most Solitary Cell In The Jail For A Month'

जिया खान सुसाइड केस संदर्भात सूरज पांचोली म्हणाला - 'मला एक महिना तुरुंगातील सर्वात निर्जन जागी ठेवले गेले होते' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली एका मुलाखतीदरम्यान जिया खान सुसाइड केसबद्दल बोलला. त्याच्यावर अभिनेत्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप केला गेला होता. सूरजने सांगितल्याप्रमाणे जेव्हा प्रकाराबाबत चौकशी सुरु होती, तेव्हा त्याला एक महिना जेलमधील सर्वात सुमसाम सेलमध्ये ठेवले गेले होते. सूरज म्हणाला, "मला ऑर्थर रोड जेलच्या अंडा सेलमध्ये ठेवले गेले होते, जी सर्वात सुमसाम सेल आहे. जिथे तुम्ही कुणाशीही संपर्क करू शकत नाही. एवढेच नाही तर तुम्हाला वाचण्यासाठी न्यूजपेपरदेखील मिळत नाही. मी पूर्णपणे स्तब्ध होतो. त्यावेळी माझ्यासाठी काही महत्वाचे नव्हते. केवळ माझ्या मनात एकच विचार होता की, मी अशी एक व्यक्ती गमावली, जिच्यावर मी प्रेम करायचो."

मीडिया खूपच बेजबाबदार झाले आहे - सूरज... 
सूरजने मुलाखतीत पुढे सांगितले, "मी गप्प राहिलो, कारण मी त्या कुटुंबाचा सन्मान करतो. त्या कुटुंबाने जे केले, मी त्याचा सन्मान करतो, पण मीडियाखूपच बेजबाबदार झाले आहे. त्यांना एकेवळ आपल्या टीआरपीची काळजी आहे. अशावेळी जेव्हा मी न्यायालयात उभा आहे आणि गोष्टी माझ्या बाजूने आहेत आणि तिथे खूप पत्रकार होते. मी त्यांना ,विचारले, तुम्ही हे छापाल का ? ते म्हणाले की, ते नाही छापणार. कारण ही एक सकारात्मक स्टोरी आहे, जी चालणार नाही. हे चुकीचे आहे, पण माझा वेळेवर विश्वास आहे."

3 जून 2013 ला घरात मृतावस्थेत मिळाली होती जिया... 
3 जून 2013 ला 25 वर्षीय अभिनेत्री जिया खान आपल्या घरात मृतावस्थेत सापडली. तिथून जियाचे एक लेटरदेखील मिळाले जे सूरजच्या नावे होते. यामध्ये लिहिले होते, "एक वेळ अशी होती जेव्हा मी माझे आयुष्य तुझ्यासोबत पाहायचे. तुझ्यासोबत माझे भविष्य पाहायचे. पण तू माझी स्वप्न मोडून टाकली." ऑक्टोबर 2013 मध्ये जियाची आई राबियाने मुंबई हायकोर्टाकडे न्याय मागितला आणि म्हणाल्या की, त्यांच्या मुलीची हत्या झाली आहे. राबियाने सीबीआय तपासणीची मागणी केली, जी  स्वीकारली होती. 

तपासादरम्यान सूरजने लपवले सत्य... 
सीबीआयनुसार, तपासादरम्यान सूरजने सत्य लपवले आणि खोटी माहिती दिली. त्याने पॉलीग्राफ किंवा ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यासही नकार दिला. 2015 मध्ये चित्रपट 'हीरो' ने बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या सूरजचा आगामी चित्रपट 'टाइम टूडांस' आहे, ज्यामध्ये तो कतरिना कैफची बहीण इसाबेलच्या अपोजिट दिसणार आहे. याव्यतिरिक्त तो 'सॅटेलाईट शंकर' मध्येदेखील दिसणार आहे. जो ऑक्टोबरमध्ये रिलीज होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...