आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Response To The Firing In Poke, Two People Were Killed, Two Injured, Indian Army Information And Eight Houses Were Damaged.

पीओकेत प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ३ जण ठार, ११ जखमी, भारतीय लष्कराची माहिती, आठ घरांचेही झाले नुकसान

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक छायाचित्र  - Divya Marathi
प्रतीकात्मक छायाचित्र 

जम्मू : पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (पीओके) डिसेंबर महिन्यात प्रत्युत्तराच्या गोळीबारात किमान तीन जण ठार झाले, तर ११ जण जखमी झाले. या गोळीबारात आठ घरांचे नुकसान झाले. लष्कराच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

लष्करी सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये डिसेंबर महिन्यात आतापर्यंत नीलम खोऱ्यात दोन जणांचा आणि झेलम खोऱ्यात एकाचा मृत्यू झाला. पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर गेल्या दोन आठवड्यांत अकारण गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानचे सैनिक सीमेपलीकडून सतत गोळीबार करत आहेत. लष्कराने सीमेपलीकडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. गोळीबारात सीमेपलीकडून मृत्यू आणि नुकसान झाल्याचे वृत्त येत आहे.

सूत्रांनी सांगितले की, पाकव्याप्त काश्मीरच्या भागांत भारतीय लष्कराने केलेल्या प्रत्युत्तराच्या गोळीबारात किमान ११ जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यात ९ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. आठ घरांचेे आंशिक नुकसान झाले आहे, तर दोन घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. गोळीबारात दोन जनावरांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

वर्षभरात पाकने २,३०० वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०१९ या वर्षात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास २,३०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यापैकी एक हजारपेक्षा जास्त घटना कलम ३७० रद्द झाल्यानंतरच्या आहेत.