आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Saudi Arabia, Foreign Women And Tourists Will Be Able To Stay Together In The Hotel, And The Room Can Be Booked For Saadi Women Too!

साैदी अरेबियात परदेशी महिला-पुरुष पर्यटक हाॅटेलात एकत्र राहू शकणार, साैदी महिलांनाही रूम बुक करता येणार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध- साैदी अरेबियात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आहे. त्याचाच भाग म्हणून देशातील हाॅटेलांत आता परदेशी महिला-पुरुषांना एकाच खाेलीत उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. साैदी अरेबियात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने नवीन व्हिसा कार्यक्रमात काही बदल करण्यात आले आहे. नवीन कार्यक्रमामुळे देशात परिवर्तन येत असल्याचे दिसू लागले आहे. याआधी साैदीत एका खाेलीत स्त्री-पुरुष एकत्र राहू शकत नव्हते. 
 

आतापर्यंत विदेशी महिला व पुरुष पर्यटकांना नातेसंबंधाचा पुरावा दिल्याशिवाय हाॅटेलमध्ये एकत्र राहता येत नव्हते. तसा पुरावा देण्यात ते यशस्वी ठरले नाही तर त्यांना खाेली मिळत नसे. नवीन नियमानुसार विदेशी महिलाही आपल्यासाठी हाॅटेल रूम बुक करू शकतात. त्यामुळे परदेशातील येणाऱ्या महिलांना हाॅटेल बुक करणे सुलभ हाेऊ शकेल. हाॅटेलमध्ये थांबण्यासाठी जटिल प्रक्रियेचा सामना करण्याची वेळ येणार नाही, असे सरकारला वाटते. साैदीने गेल्या आठवड्यात ४९ देशांच्या पर्यटकांसाठी आपली दारे खुली केली आहेत. तेल िनर्यातीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला पर्यटन क्षेत्राचीदेखील मदत मिळावी, असे सरकारला वाटते.
 
२०३० पर्यंत पर्यटकांची संख्या १० काेटींवर नेऊन ठेवणे असे सरकारचे उद्दिष्ट आहे. दुसरीकडे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्यास देशातील काही परंपरांना धाेकाही निर्माण हाेऊ शकताे, असे रूढीवाद्यांना वाटते. त्यावरून रूढीवाद्यांच्या एका गटाने सरकारच्या या याेजनेला विराेध केला आहे. वास्तविक पूर्वीदेखील पर्यटकांसाठी अशा प्रकारची सवलत देण्यात आली हाेती. परदेशी महिलांना बुरखा, पुरुषांना पगडी परिधान करण्याची गरज नाही.