• Home
  • In Saudi Arabia, women put terms and conditions for the husband before marriage

दिव्य मराठी विशेष / सौदी अरेबियात महिला लग्नाआधीच करत आहेत करार, अटी असतात-पतीने ड्रायव्हिंग, शिक्षणास व नोकरीसाठी स्वातंत्र्य द्यावे

इस्लामी देशात लग्नानंतरचा वाद टाळण्यासाठी वधू आधीच वदवून घेत आहेत अटी

वृत्तसंस्था

Jun 25,2019 10:58:00 AM IST

रियाध - इस्लामिक देश सौदी अरेबियातील महिला आता आपल्या अटीनुसार लग्न करत आहेत. विवाहानंतर वाहन चालवणे, शिक्षण, नोकरी व फिरण्याच्या स्वातंत्र्यासाठी आता त्या पतीशी कायदेशीर करार करत आहेत. लग्नानंतर कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवू नये यासाठी हा उपाय योजला जात आहे. गेल्या अनेक दशकांच्या बंदीनंतर गेल्या वर्षी महिलांच्या वाहन चालवण्यावरील बंदी उठवली हाेती. यानंतर मोठ्या संख्येने महिलांनी वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी अर्ज केले होते. रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे. महिला केवळ सामान्य ड्रायव्हिंगच करत नाहीत तर त्या भरधाव गाडी चालवत स्टंटही करत आहेत.


सेल्समनचे काम करणारे मज्द यांच्या म्हणण्यानुसार, तो लग्नाच्या तयारीत गुंतला होता, त्यादरम्यान त्याच्या होणाऱ्या पत्नीने अनोखी अट घातली. मुलीने मागणी केली हाेती की, मज्द लग्नानंतर तिला गाडी चालवण्यास, नोकरी करण्यास परवानगी देईल. लग्नानंतर मज्दने तिच्या मागणीकडे डोळेझाक करू नये यासाठी तिने विवाह करारही केले आहे. अन्य एका तरुणीने वाग्दत्त वराशी करार केला. त्यात तो कधीही दुसरा विवाह करणार नसल्याची अट घातली. या प्रकरणी मौलवी अब्दुलमोहसेन अल-अजेमी यांच्या म्हणण्यानुसार, काही तरुणी वाहन चालवण्यावरून करार करत आहेत. लग्नानंतर सासरच्या लोकांनी ठरलेल्या अटी मोडल्यास महिला पतीकडून तलाकही घेऊ शकते. इस्लामिक देशांमध्ये लग्नानंतर महिलांचा आवाज दाबण्याची प्रकरणे येत असतात. या कारणास्तव हवा तसा करार करण्याची पद्धत सुरू झाली आहे.

अरबमध्ये स्वत:ला धार्मिक न मानणारे वाढत आहेत
दुसरीकडे, अरबमध्ये धार्मिक नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मध्य पूर्व व उत्तर आफ्रिकेच्या १० देशांतील २५ हजार लोकांत केलेल्या पाहणीत धार्मिक नाहीत असे म्हणणाऱ्यांची संख्या ८% वरून १३% झाली आहे. गेल्या ३० वर्षांत येथे धार्मिक नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या १८% वाढली आहे. ही संख्या आतापर्यंतची सर्वात जास्त मानली जाते. बीबीसी व अरब बॅरोमीटर रिसर्च नेटवर्कने ही पाहणी केली होती.

X
COMMENT