आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगनगरी श्री सिटीत ५० हजार कर्मचाऱ्यांपैकी ५०% महिला, त्यांनी बदलली कार्यसंस्कृती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवानी चतुर्वेदी 

श्री सिटी (आंध्र प्रदेश) - पुरुषांचे वर्चस्व असलेल्या उत्पादन क्षेत्रातही आता महिलांनी कर्तबगारी दाखवणे सुरू केले आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्री सिटी यांचे सर्वात मोठे उदाहरण आहे. ही शक्यतो देशातील एकमेव उद्योग नगरी आहे, जेथे महिला कर्मचाऱ्यांचा वाटा सुमारे ५०% आहे. येथील १४० कंपन्यांमध्ये ५० हजार लोक काम करतात. दहा हजार महिला तर एकट्या फॉक्सकॉन कंपनीत आहेत. ज्या एकूण कर्मचाऱ्यांच्या ८५% आहेत.तैवानची ही कंपनी अॅपल, शाओमी, नोकियासारख्या ब्रँडसाठी मोबाइल बनवते. येथे काम करणाऱ्या बहुतांशी महिलांचे वय १८ ते २८ च्या दरम्यान आहे. जास्त महिला दहावी उत्तीर्ण आहेत आणि त्या विशेष प्रशिक्षण घेऊन या कामासाठी तयार होत आहेत. येथे महिला स्मार्टफोनच्या पार्टसची तपासणी, जुळवणी, गुणवत्ता तपासणी आणि पॅकिंगपर्यंतची सर्व महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्या केवळ जुळवणीच्या कामातच नव्हे तर एचआरपासून अकाउंट्स आणि व्यवस्थापनातही आहेत. कारखान्यात दररोज ८० हजार ते १ लाख मोबाइल तयार होतात. फॉक्सकॉन इंडियाचे मुख्य जोश फोल्गर सांगतात की, कारखान्यात जास्त महिलांना रोजगार देण्याची कल्पना त्यांच्या आईची होती. आई शिक्षिका होती आणि त्यांचे बहुतांशी विद्यार्थी वंचित घटकातील होते. त्या सांगायच्या की, महिला जास्त मेहनती आणि समर्पित असतात. ही गोष्ट खरी ठरली. यामुुळे २०१५ कंपनीत केवळ ८० महिला कर्मचारी होत्या. आज ही संख्या वाढून दहा हजार झाली आहे. फॉक्सकॉनमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे चांगले परिणाम दिसल्याने इतर कंपन्यांमध्येही त्यांना प्राधान्य देणे सुरू केले. सर्व ठिकाणी महिलांची भागीदारी वाढू लागली. कॅडबरी चॉकलेट्स बनवणारी मॉन्डलीझ आंतरराष्ट्रीय कंपनीचे एचआर सल्लागार अरुण कुमार सांगतात की, कंपनीत ३१० कर्मचारी आहेत. त्यातील ५३% महिला आहेत. याच प्रकारे कॅलॉग्सच्या २११ कर्मचाऱ्यांपैकी ४० महिला आहेत. त्यांचे उद्दिष्ट महिलांना ५०% भागीदारी देण्याचे अाहे. श्री सिटीच्या परिसरातील १३ जिल्ह्यांमधून महिला कामासाठी येताहेत. कारखान्यात घरासारखे आनंदी वातावरण

श्री सिटी कस्टमर रिलेशन्सचे उपाध्यक्ष रमेश कुमार सांगतात की, या औद्योगिक नगरीत महिलांनी कार्य संस्कृतीला कुटुंबात काम करण्यासारखे केले आहे. कारखान्यातील वातावरण आनंदी असते आणि यामुळे काम सहजपणे होते.