आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियात थकवा व तणाव घालवण्यासाठी लोक जातात 24 तास खोट्या तुरुंगात; कैदेसाठी द्यावे लागतात ६ हजार रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगचियान - दक्षिण कोरियातील लाेकांनी रोजच्या आयुष्यात तणावापासून दूर राहण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. हा मार्ग आहे तुरुंगाचा. येथील उत्तर पूर्व हाँगचियान शहरात २०१३ मध्ये लाेकांना तणावमुक्त राहण्यासाठी व थकवा घालविण्यासाठी एक खोटा तुरुंग तयार केला आहे. या तुरुंगात २४ तास बंद राहिल्यानंतर ९० डॉलर म्हणजे ६३५० रुपये द्यावे लागतात.  येथील नियम खूप कठोर आहेत. तुम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही. मोबाइल व घड्याळ जवळ बाळगू शकत नाहीत.  येथे येणाऱ्यांना कैद्याप्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश त्याचबरोबर योग मॅट, टी सेट व पेन दिली जाते. जमिनीवर झोपावे लागते. 

 

तुरुंगात आल्यानंतर जास्त ऊर्जा मिळते : पार्क हाई

कार्यालयात काम करणाऱ्या पार्क हाई-रे या तरुणीने  सांगितले, मी  येथे थकवा व तणाव दूर करण्यासाठी येथे आले होते. हा तुरुंग माझ्या मनात स्वतंत्र असल्याची भावना निर्माण करतो. या खोट्या तुरुंगात मी ९० डॉलर दिले आहेत. परंतु येथील तुरुंगात पुन्हा यावे वाटते. या तुरुंगाची संचालिका नो जी हियांग यांनी सांगितले, खोटा तुरुंग तयार करण्याची प्रेरणा मला पतीपासून मिळाली. माझे पती आठवड्यातून १०० तास काम करत असत. लाेकांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक त्या सुविधा येथे आहेत. यामुळे लोकांचा तणाव दूर होतो. त्यांच्यात नवी ऊर्जा तयार होते. 

 

द. कोरियात लोक वर्षातील २०२४ तास काम करतात 
एका सर्व्हेत असे दिसून आले की, दक्षिण कोरियातील लोक कामाच्या बाबतीत मेक्सिको, कोस्टा रिकानंतर तिसऱ्या स्थानावर असून ते वर्षभरात सरासरी २०२४ तास काम करतात. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने २०२७ मध्ये ३६ देशाचा सर्वे केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...