आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • In Stock Market 'Hrithik' In 2019 And 'Salman' In 2020 Success, Index Is Right But There Is No Return.

शेअर बाजारात 2019मध्ये 'हृतिक'चा तर 2020मध्ये 'सलमान'चा जलवा, इंडेक्स सही है लेकिन रिटर्न नहीं है..अशी स्थिती

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक

औरंगाबाद : सरत्या वर्षात भारतीय शेअर बाजाराने उच्चांक गाठत ४१ हजारांचे शिखर सर केले. येणारे नवीन वर्ष मात्र गुंतवणूकदारांसाठी संमिश्र राहून साधारणत: १० ते १५ टक्के परतावा देण्याची शक्यता असल्याचे भांडवल बाजार विश्लेषक केदार ओक यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले. मावळत्या वर्षात भांडवल बाजारावर हृतिक' स्टाॅकची छाप हाेती आता नव्या वर्षात सलमान' स्टाॅक आपला प्रभाव दाखवणार का अशी दलालांमध्ये चर्चा आहे.

संपत असलेल्या वर्षातील अनुभव बघता भांडवल बाजारातील जी २० क्षेत्र अहेत त्यामध्ये प्रामुख्याने टेक्नाॅलाॅजी, बँकिंग, एफएमसीजी, फार्मा या केवळ चार क्षेत्रांनी सातत्याने गुंतवणूकदारांना सरासरी १८ ते २० टक्के असा चांगला परतावा दिला. उर्वरित १६ क्षेत्रापैकी रिअॅल्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया यांनी नकारात्मक, तर बाकीच्या क्षेत्रांनी ७ ते ११ टक्के असा संमिश्र प्रतिसाद दिला. एकंदरीत बाजारातील सध्याचा कल बघता इंडेक्स स्टाफ जास्त देतील असे तूर्तास कठीण वाटते. कारण दाताची तेजी ही प्रमुख सम भागांमुळे अकाली आहे. ब्रेक्झिट, भारतीय अर्थव्यवस्थेला अडलेली मरगळ याचा विचार करता येणाऱ्या काळात तेजी दर्शवणाऱ्या क्षेत्रांचा अभ्यास करून गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्क्यांपर्यंत परतावा पदरात पडू शकताे. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न बघताना केंद्र सरकार काय याना राखते अणि काॅर्पाेरेट जगत त्याला कसा प्रतिसाद देते यावरही बऱ्याच गाेष्टी अवलंबून असतील, असे अनेक म्हणाले.


गेल्या २० वर्षांत अर्थिक क्षेत्रात झालेले वेगवेगळे बदल त्याचबराेबर म्युच्युअल फंड योजनांमध्ये झालेली फेररचना यामुळे मिडकॅप अणि स्माॅलकॅप समभाग अजूनही ३० ते ४० टक्के नकारात्मक परतावा देत अाहेत. यातील काही समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास साधारण च्या तुलनेत दुप्पट परतावा (अंदाजे २० ते २५ %) मिळू शकता याकडे अनेक यांनी लक्ष वेधले.

२०१३ मध्ये भांडवल बाजारातील तेजीला प्रारंभ झाला व २०१७ मध्ये ती कमाल पातळीवर गेली. नवीन तेजी सुरू झाली असून २०२२ सेन्सेक्स कमाल पातळीवर जाऊ शकतो. नवीन वर्षामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजार तेजी धरून ठेवेल अणि त्यानंतर बाजार अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करेल असे ते म्हणाले. ज्या पध्दतीने शेअर बाजाराचा निर्देशांक वाढत आहे ते लक्षात घेता एक गाेष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे विदेशी गुंतवणूकदार भांडवल बाजारात खरेदी करण्याच्या मूडमध्ये आहेत.


गुंतवणूकदारांनी निर्देशांक किती हाेईल, बाजार किती खाली जाईल याचा विचार न करता ज्या कंपन्या चांगला परतावा देतील अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे ओक यांनी सांगितले.

भांडवल बाजारात अर्थसंकल्पपूर्व व अर्थसंकल्पानंतर वेगवान हालचाली अपेक्षित... 

नवीन वर्षात भांडवल बाजारात अर्थसंकल्प पूर्व अणि अर्थसंकल्पानंतर बाजारात गाडीशी दुरुस्ती (करेक्शन) अपेक्षित असून साधारणपणे ३९,००० किंवा ३८,६००च्या पातळीवर बाजार येऊ शकताे. येणारे करेक्शन प्रामुख्याने इंडेक्स स्टाॅकमध्येच असेल.

भांडवल बाजाराचा काढावा घ्या, मग खरेदी करा

गुंतवणूकदारांनी वाहिन्या किंवा माध्यमांद्वारे सुचवलेले समभाग खरेदी करण्याआधी त्यांनी स्वत: गेल्या तीन ते सात महिन्यांत त्या समभागांच्या किमतीत किती चढ-उतार झाला याचा काढावा घ्यावा. थोडक्यात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जालीम पत्करू नये, असा सल्ला अनेक यांनी दिला.

छाेट्या गुंतवणूकदारांनी काय करावे ?

छाेटे गुंतवणूकदार महिन्याला ५ ते १० हजारची रेकरिंग गुंतवणूक करू शकतात. माेठे एक ते दाेन समभाग वा ५ शेअर्स महिन्याला खरेदी करू शकतात. लार्जकॅप, मिडकॅप, स्माॅलकॅप यातून चांगल्या समभागांची निवड करून एसआयपी प्रमाणे ते एसआयपी करू शकतात. त्याप्रमाणे दरमहा थाेडे समभाग खरेदी केले तरी वर्षभरात शेअर्सचा चांगला पाेर्टफाेलिओ तयार हाेऊ शकेल.

'हृतिक' स्टॉकने भांडवली बाजारात ९५ टक्के तेजी दाखवली

सरत्या वर्षात (२०१९-२०) राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांका सहा हृतिक स्टाॅक्सने भांडवल बाजारात ९५ टक्के तेजी दाखवली हाेती. आता येणारे नवीन वर्ष 'सलमान' ठरेल का, अशी सध्या दलालांमध्ये चर्चा असल्याचे ओक यांनी सांगितले. हृतिक- सलमान स्टाॅक असे...

हृतिक वर्ष २०१९, सलमान वर्ष २०२०

 • H - एचडीएफसी बँक S - एसबीआय
 • R - रिलायन्स A - अॅक्सिस बँक
 • I - आयसीआयसीआय बँक L - लार्सन
 • T - टीसीएस M - मारुती
 • I - इन्फी A - अदानी पाेर्ट‌्स
 • K - काेटक बँक N - एनटीपीसी

गुंतवणूकदारांनी या गाेष्टी लक्षात ठेवाव्यात?

 • येणाऱ्या तीन महिन्यांतील बाजाराच्या हालचाली लक्षात घेऊन गुंतवणूक करावी
 • गुंतवणूक करताना तीन महिन्यांतील सेन्सेक्स व समभागांच्या कमाल/ किमान पातळीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा
 • बाजारात हाेणाऱ्या करेक्शनचा फायदा घेऊन चांगले समभाग खरेदी करावेत.
 • सध्या तेजी असलेल्या समभागांमध्ये गुंतवणूक टाळावी

दीर्घ गुंतवणुकीसाठी समभाग

एफएमसीजी, बँकिंग, बँकेतर क्षेत्र, तेल अाणि वायू, स्टील, इन्फ्रास्ट्रक्चर, कंपन्या क्षेत्रांचा पर्याय चांगला आहे. मिडकॅपवर लक्ष ठेवा.
 

बातम्या आणखी आहेत...