आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Support Of CAB, March In Hingoli, Aundh; Significant Participation Of Women In Hingoli

कॅबच्या समर्थनार्थ हिंगोली, औंढ्यात मोर्चा, हिंगोलीत महिलांचा लक्षणीय सहभाग, प्रशासनाकडे निवेदन सादर

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ हिंगोली व औंढा नागनाथ येथे मंगळवारी ता. २४ मोर्चा काढण्यात आला. हिंगोलीतील मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांच्या हातात कॅबच्या समर्थनार्थ फलक होते. सुमारे अडीचशे फुट लांबीचा तिरंगा ध्वज हाती घेऊन निघालेला हा मोर्चा इंदिरा गांधी पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर तेथे मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामधे नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत पसरवले जात असलेले गैरसमज व खरे विधेयक काय आहे याची माहिती देण्यात आली. त्यानंतर महिलांच्या एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात वकील संघाचे पदाधिकारी, नागरिक, व्यापारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मोर्चाच्या वेळी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद होती. पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, औंढा नागनाथ येथे ग्रामपंचायत प्रांगणातून मोर्चा काढण्यात आला. आमदार संतोष बांगर, राम कदम, मुन्ना बांगर, भास्कर पाठक, तेजकुमार झांझरी, सुरजितसिंह ठाकूर, अनिल देशमुख, सचिन देव, साहेबराव देशमुख, बालाजी सातव, राजू पटवे, नीळकंठ देव, सुनील पुराणिक यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. तर मोर्चेकऱ्यांनी पोलिस अधिकारी वैजनाथ मुंडे व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
 

बातम्या आणखी आहेत...