Home | International | Other Country | In Tehran public places dogs are not allowed to walk

तेहरानमध्ये सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना फिरायला नेण्यास मनाई; कारण : इराणमध्ये धर्मगुरू व राजकारणी कुत्र्यांना मानतात निषिद्ध 

वृत्तसंस्था | Update - Feb 13, 2019, 10:03 AM IST

युक्तिवाद : कुत्र्यांमुळे सार्वजनिक स्थळी नमाजात अडचणी 

 • In Tehran public places dogs are not allowed to walk

  तेहरान- इराणमध्ये राजधानी तेहरानमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्र्यांना फिरायला नेण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी इस्लामिक देशात दीर्घकाळापासून कुत्रे पाळण्यावर घालण्यात आलेल्या बंदीचाच एक भाग आहे. काही दिवसापूर्वी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना नेण्यास बंदी घालण्यासाठी प्रॉसिक्यूटर ऑफिसने शहराचे पोलिस प्रमुख हसन रहिमी यांच्याकडून परवानगी काढली आहे. त्यानंतर शहरातील सार्वजनिक ठिकाणे म्हणजे, पार्कमध्ये कुत्र्यांना नेल्यास दंड तर होईलच शिवाय पोलिस कुत्रे घेऊन जातील, अशी घोषणाही करण्यात आली. एका अधिकाऱ्याने म्हटले, ज्यांच्याकडे कुत्रे नाहीत अशा लोकांमध्ये भिती पसरते. शिवाय रस्त्यावर फिरणेही अवघड होते.

  केवळ सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर कारमधूनही नेणाऱ्या कुत्र्याच्या मालकावर होईल कारवाई
  या बंदीला बहुतांश जनता कुत्र्यांना देण्यात येणाऱ्या महत्वावर बंदी घालण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनातून पाहते आहे. देशातील धार्मिक नेते कुत्र्यांना अस्वच्छ व निषिद्ध मानतात. कुत्रे पाळण्याची आवड म्हणजे लोकांवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असल्याचे येथील धार्मिक नेत्यांना वाटते. ही संस्कृती १९७९ मध्ये येथे झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर उदयास आली. हसन रहिमी यांनी सांगितले, शहरात जी मंडळी कुत्र्यांना फिरण्यास नेत असतात,त्यांच्यामुळे इतरांवर भितीचा प्रभाव पडतो. हे योग्य नाही. पोलिस आता कुत्र्यांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार आहेत. केवळ सार्वजनिक ठिकाणीच कुत्रे नेणाऱ्यांवर नव्हे तर कारमधून जी मंडळी कुत्र्यांना फिरवत असतात, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. येथील एका राजकीय नेत्याचे मत असे की, कुत्र्यांना रस्त्यांवर फिरायला नेण्याने लोकांना उघड्यांवर नमाज अदा करता येत नाही. देश आर्थिक संकटात असताना श्वानप्रेमी कुत्र्यांवर पैसे अफाट पैसा खर्च करत आहेत. हा पैसा देशाच्या विकासासाठी कामाला येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

  पेट्ससाठी तुरुंगात जाण्याची लोकांची तयारी
  याआधी २०१० मध्ये इराणमध्ये एका धार्मिक नेत्याने कुत्रे पाळण्यावरून एक फतवा जारी केला होता. कारण ते निषिद्ध आहेत तरीही तेहरानमध्ये खूप लोक कुत्रे पाळतात. नवे प्रतिबंध असतानाही लोक पोलिसांना दंड देण्यास इतकेच नव्हे तर त्यांचसाठी तुरुंगात जाण्यासही तयार आहेत. परंतु कुत्र्यांना सोडण्यास तयार नाहीत, अशी टीका आता होते आहे.

Trending