आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीखविरोधी दंगल प्रकरणी दोषींना पिंजऱ्यात उभे करू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्तारपूर साहिब व १९८४ च्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्ला चढवला. मोदी म्हणाले, त्यांचे सरकार १९८४ च्या शीख दंगलीतील दोषींना आरोपीच्या पिंजऱ्यात आणेल आणि पीडितांना न्याय देईल, असेही ते म्हणाले. 

 

शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान निवासस्थानी विशेष नाणे जारी केल्यानंतर ते संवाद साधत होते. माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग व माजी सरन्यायाधीश जे.एस. खेहर उपस्थित होते. मोदी म्हणाले, गुरू गोविंदसिंगजी असो की गुरू नानकदेवजी आपल्या गुरूंनी न्यायासोबत उभे राहण्याचा धडा दिला. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालताना आज केंद्र १९८४ मध्ये सुरू झालेल्या अन्यायादरम्यान न्यायापर्यंत पोहोचण्यात गुंतले आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे कर्तारपूर कॉरिडॉरचे काम सुरू झाले व आता भाविक गुरुद्वारा दरबार साहिबच्या दर्शनासाठी जाऊ शकतील. पंतप्रधान म्हणाले, ऑगस्ट १९४७ मध्ये जी चूक झाली होती, त्याचे हे कॉरिडॉर प्रायश्चित्त आहे. १९४७ ची चूक सुधारण्यात आली आहे. नव्याने निर्माण होणारा कॉरिडॉर ते नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करेल,असे मोदी यांनी स्पष्ट केले. 
 

बातम्या आणखी आहेत...