आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिका अत्याचार, खूनप्रकरणी आदेशबाबाला मरेपर्यंत जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - समतानगरातील धामणगाव वाडा भागात राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून नंतर गळा आवळून तिचा खून केल्याप्रकरणी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (६३, रा.समतानगर) याला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व १ लाख ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा शनिवारी ठोठावली. दरम्यान, त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पीडित बालिकेचे कुटुंबीय उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.  


आदेशबाबा याने १२ जून २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धामणगाव वाडा भागातील ९ वर्षीय बालिकेचे अपहरण केले. काही वेळातच तिच्यावर अत्याचार करून रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान, गळा आवळून तिचा खून केला होता. यानंतर रात्रीच्या अंधारात बालिकेचा मृतदेह पोत्यात टाकून घराशेजारीच असलेल्या एका टेकडीवर नेऊन टाकला होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आदेशबाबा याला अटक करून न्यायालयात दोषारोप सादर केले. एकूण २७ साक्षीदारांनी या खटल्यात साक्ष दिल्या. सुनावणीअंती अखेर आदेशबाबाविरुद्ध लावण्यात आलेल्या सर्व कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आले होते. शनिवारी प्रमुख व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांनी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके, मूळ फिर्यादीतर्फे अॅड.एस.के. कौल यांनी काम पाहिले. तर बचाव पक्षातर्फे अॅड.जळमकर यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...