आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना उपनिरीक्षक जाळ्यात; नोकरी जाण्याची भिती दाखवून 1 लाखांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : तुमच्या मुलाविरुध्द एका महिलेने ३७६ या गुन्ह्याची तक्रार दिली आहे. हा प्रकार तोंडी सांगून तुमच्या मुलाची नोकरी जाईल, यासाठी तुम्ही मला १ लाख रुपये द्या, हे प्रकरण पाच लाखात मिटवितो, असे सांगून अॅडव्हान्स म्हणून १० हजार रुपये स्विकारतांना कदीम जालना पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक भागूजी बजाजी पांढरे (पोलिस वसाहत, जालना) हा लाचलूचपत प्रतिबंधक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. 

 

तुमच्या मुलाविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली असल्याचे असल्याचे सांगून पालकाला बोलवून घेतले. एक लाख रुपये द्या, अर्जदार पाच लाख मागत आहे, असे म्हणून अॅडव्हान्स म्हणून दहा हजार रुपये घेण्यासाठी तयार झाला. दरम्यान, गुरुवारी कदीम पोलिस ठाण्याच्या परिसरातच सापळा लावला असता, १० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक चव्हाण, अशोक टेहरे, संतोष धायडे, संदीप लव्हारे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवने आदींनी पार पाडली. 

 

बातम्या आणखी आहेत...