आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड - शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील महिला नगरसेवक अारसिया बेगम चाऊस यांना तीन अपत्य असल्या प्रकरणी चौकशीअंती त्यांचे नगरसेवक सदस्यत्व रद्दचे अादेश शासनाकडून जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाल्याने त्यांचे आदेशानुसार अारसिया बेगम चाऊस यांचे नगरसेवकपद रद्द झाले अाहे. त्यानुसार एक जागेसाठी पाेटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
बीड नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ११ मधील महिला नगरसेवक आरसिया बेगम चाऊस या २०१६ च्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या हाेत्या. दरम्यान, त्यांना तीन अपत्य असल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली हाेती. त्यानुसार राज्य शासनाने निवडणूक निकषानुसार त्यांचे पद रद्दचे आदेश काढले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेशाची तामील केली असून या एक रिक्त जागेसाठी पाेटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार २ ते ९ जानेवारी २०१९ पर्यंत या एक जागेसाठी उमेदवारी अर्ज भरून घेतले जाणार असून २७ जानेवारी राेजी मतदान घेतले जाणार आहे तर २८ जानेवारी राेजी मतमोजणी हाेणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डाॅ. धनंजय जावळीकर हे काम पाहत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.