आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणुकीत सर्वात आधी गावित परिवाराला विश्वासात घेतले जाईल - काँग्रेसचे माणिकराव गावितांना आश्वासन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नंदुरबार - नवापूर काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा दादा. आगामी जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीवेळी सर्वात आधी गावित परिवाराला विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर माणिकराव गावित व भरत गावित यांच्या राग कमी झाला. माणिकराव गावित यांनी काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठीना आम्ही काँग्रेस पक्षासोबत राहू. आम्ही कुठेही जाणार नाही. पक्षासाठी काम करू. असे मत माणिकराव गावित व्यक्त केले.

 

मी आदिवासी असल्यामुळे मला अशी वागणूक

नंदुरबार लोकसभा मतदार संघात माजी केंद्रीय राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांना काँग्रेस पक्षाचे तिकिट न दिल्याने नाराज झाले होते. अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता. यावर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना गावित परिवाराला भेटीसाठी शुक्रवारी संध्याकाळी फोन करून माहिती दिली. यानंतर लगेच गावित परिवार वरिष्ठांना भेटण्यासाठी मुंबईला गेले. परंतु मल्लिकार्जुन खर्गे माणिकराव गावित यांना न भेटताच निघून गेल्यामुळे गावित नाराज झाले होते. मी आदिवासी जातीचा असल्याने माझी भेट घेण्यासाठी उशीर लावत आहे असे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांनी माणिकराव गावित यांची समजूत काढत वरिष्ठांसोबत भेट घडवून आणली. गावित परिवाराचा राग कमी होऊन आश्वासन दिल्यानंतर माणिकराव गावित यांच्या परिवारावर स्मित हास्य दिसून आले.

 

यावेळी इगतपुरी मतदारसंघाची आमदार निर्मला गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, जिल्हा परिषद सदस्य संगीता गावित, नाशिक जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...