आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची दुष्काळात होरपळ, मुख्यमंत्री फाइव्ह स्टार हॉटेलात- अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - शेतकरी दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री, मंत्री सरकारला चार  वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंचतारांकित हाॅटेलात आनंदोत्सव साजरा करीत आहेत. नापिकीमुळे राज्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  याचे सरकारला सोयर सतक नाही. ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा देणारा भाजप  आता ‘बेटी भगाव’चा नारा देत अाहे. या सरकारला खाली खेचून काँग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी येथे केले.
जनसंघर्ष यात्रेनिमित्त सिल्लोड येथे मंगळवारी रात्री आयोजित सभेत खा. चव्हाण बोलत होते.    या वेळी   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ सिने अभिनेते तथा उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राज बब्बर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा अध्यक्ष तथा आ.अब्दुल सत्तार, सत्यजित तांबे, माजी आमदार कल्याणराव काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


 सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम नेतृत्व असल्याची टीका केली.  प्रास्ताविक आ.अब्दुल सत्तार यांनी केले. 
दरम्यान सिल्लोड येथील सभेपूर्वी फुलंब्री येथेही   जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  राधाकृष्ण विखे पाटील,  हर्षवर्धन पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, माजी आ.डॉ.कल्याण काळे, माजी आ.धोंडीराम राठोड, सेवादल प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जगन्नाथ काळे, संदीप बोरसे, रामराव शेळके, संजय औताडे, किशोर बलांडे, भाऊसाहेब जगताप यांची  उपस्थिती होती. 

 

आ.सत्तार मंत्री होणार 
अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात आ.सत्तार यांची स्तुती केली.  आमदार सत्तार हे  विराट कोहली अाहेत.  आगामी काळात राज्यात काँग्रेसचे सरकार येणार आहे. या सरकारमध्ये आमदार सत्तार मंत्री होणार आहेत, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...