आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच प्रयत्नात अाठ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम ब्रेक; १०० मीटरचे अंतर .३५ फॅक्शनआधीच गाठणारी साक्षी ठरली चॅम्पियन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कूल नॅशनल गेम्समधील पदक विजेत्या प्रतिभावंत धावपटू साक्षी चव्हाणने साेमवारी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नाेंद केली. अाैरंगाबादच्या या १४ वर्षीय धावपटूने पहिल्यादाच सहभागी हाेताना १६ व्या अांतर जिल्हा राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेचा ८ वर्षापूर्वीचा विक्रम ब्रेक केला. तिने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. साक्षीने १४ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटरचे अंतर .३५ फॅक्शनपुर्वीच गाठून विक्रम नाेंदवला. तिने १२.३८ सेकंदांमध्ये निश्चित अंतर गाठून अव्वल स्थानावर धडक मारली. यापूर्वी केरळच्या मंजिदा नाेव्हरिनने २ डिसेंबर २०१० मध्ये अांतर जिल्हा स्पर्धेच्या १०० मीटर गटात १२.७३ सेकंदांत सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम केला हाेता. 

यामुळे साक्षीला पहिल्याच प्रयत्नात चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळवता अाला. ही स्पर्धा अांध्र प्रदेशातील तिरुपती येथे अायाेजित करण्यात अाली हाेती. या स्पर्धेत भारतातील ४३३ जिल्ह्यातील ५६०० धावपटू सहभागी झाले हाेते. यात अाैरंगाबाद जिल्ह्याचे १३ खेळाडू सहभागी झाले हाेते. यामध्ये एका मुलासह १२ मुलींचा समावेश हाेता. यातील संचिता माेरेने एक हजार मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये अाठवे स्थान गाठले. तसेच साईची कल्पना लांब उडीच्या प्रकारात सातव्या स्थानावर राहिली. अांतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र माेदी यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने साेनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. 


१०० मी. मधील पदक विजेते 
वेळ पदक धावपटू 
१२.३८ से. सुवर्ण साक्षी चव्हाण (अाैरंगाबाद) 
१२.८३ से. राैप्य एेश्वर्या माेरे (नाशिक) 
१३.०० से. कांस्य सिया सावंत (मुंबई) 

 

जानेवारीत पुन्हा गाजवणार स्कूल गेम्स 
साेनेरी चमक कायम ठेवताना अाता पुढच्या वर्षी स्कूल नॅशनल अॅथलेटिक्स स्पर्धा गाजवणार असल्याचा विश्वास धावपटू साक्षीने व्यक्त केला. ही स्पर्धा पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये राेहतक येथे अायाेजित करण्यात अाली अाहेे. गत स्पर्धेत तिने दाेन गटांत पदकाची कमाई केली हाेती. 

 

नाशिकची एेश्वर्या दुसऱ्या स्थानी; महाराष्ट्राचा दबदबा 

स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या युवा धावपटूंनी वर्चस्व राखले. या गटातील तिन्ही पदके महाराष्ट्राच्या युवा धावपटूंनी पटकावली. यामध्ये अाैरंगाबादची साक्षी अव्वल स्थानावर राहिली, तर नाशिकच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाअंतर्गत जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या एेश्वर्या माेरेने राैप्यपदकाचा बहुमान पटकावला. तिने १२.८३ सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. यासह ती दुसऱ्या स्थानावर राहिली. तिने प्रशिक्षक सुरेश काकड यांच्या मार्गदर्शात हे यश संपादन केले. तसेच मुंबईच्या सिया सावंतने कांस्यपदकाची कमाई केली. तिने १३.०० सेकंदांमध्ये हे अंतर गाठले. 

 

केरळच्या मंजिदाच्या विक्रमाला टाकले मागे 
औरंगाबाद येथील क्रीडा प्रबाेधिनीच्या साक्षी चव्हाणने पहिल्यांदाच या अांतर जिल्हा राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभाग घेतला हाेता. स्कूल नॅशनल गेम्समध्ये गतवर्षी पदक जिंकल्याने तिचा अात्मविश्वास द्विगुणीत झाला हाेता. त्यामुळे अाता या नव्या स्पर्धेतही पदकाची कमाई करण्याचा तिने निर्धार केला. यासाठी प्रचंड मेहनत घेताना तिने १०० मीटरची शर्यत गाजवली. तिने या गटात सुवर्णपदकासह राष्ट्रीय विक्रमाचा झेंडा फडकावला. तिने १२.३८ सेकंदांमध्ये १०० मीटरचे अंतर पूर्ण केले. यासह तिने अाठ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. यापूर्वी केरळच्या मंजिदा नाेव्हरिनने २ डिसेंबर २०१० मध्ये अांतर जिल्हा स्पर्धेच्या १०० मीटर गटात १२.७३ सेकंदांत सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम केला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...