आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा तासामध्ये ७८ पोलिस पथकांच्या नाकावर टिच्चून लांबवली ३ मंगळसूत्रे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : तोंडाला फडके बांधून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी शनिवारी शहरातील पोलिस फाैजफाट्याला गंुगारा देऊन आकाशवाणी चाैक ते बीड बायपास रस्त्यावरील अयप्पा मंदिर परिसरात तीन महिलांची मंगळसूत्रे हिसकावून पोबारा केला. सकाळी ९ ते १०.१५ या सव्वा तासामध्ये अत्यंत गजबजलेल्या भागात या घटना घडल्या. विशेष म्हणजे शहरात एकूण १८ ठाणी अाहेत. प्रत्येक ठाण्याच्या दोन मोबाइल व्हॅन, ३८ दुचाकी, कंट्रोलच्या बारा, विशेष गुन्हे शाखेसह ४० च्या जवळपास पथकांना गुंगारा देण्यात चोर यशस्वी झाले. सव्वा तास चोर फिरत होते. एकाही ठिकाणी अडवण्यासाठी प्रयत्न झाला नाही त्यामुळे भल्या मोठ्या पोलिस यंत्रणेचा पुरता फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या चार दिवसांत मंगळसूत्र चोरीच्या ९ घटना घडल्या आहेत आणि यापैकी एकाही चोरीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, गस्ती पथके केवळ नावालाच असून मोजक्याच ठिकाणी ती दिसून येतात, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. एकाच दिवशी तीन घटना घडल्यामुळे रविवारपासून सकाळी ९ ते ११ नाकेबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.    दोन ठिकाणी नागरिक नुसते पाहत बसले रू एसबीएच कॉलनीमध्ये देवगावकर यांच्याकडे दुचाकीस्वारांनी थांबवून मंगळसूत्र तोडत असताना समोरच एक रिक्षाचालक मंद वेगात जात होता. त्याला हा सर्व प्रकार दिसत असतानादेखील त्याने कुठलीही हालचाल नाही केली. त्याने थोड्या वेगात रिक्षा समोर आणून चोरांच्या अंगावर घातली असती तर कदाचित चोर तेव्हाच हाती लागू शकले असते, असे पोलिसांनी सांगितले. अय्यप्पा मंदिराजवळदेखील घटनेच्या वेळी काही तरुण उपस्थित होते. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे पाहणी करत असताना उपस्थित तरुणांनी आपल्यासमोर चोरीचा प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र, त्यातील एकही जण पुढे आला नाही.   

एकाही घटनेत पोलिसांना सुगावा नाही
मागील चार महिन्यांमध्ये वीसपेक्षा अधिक मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या, परंतु आतापर्यंत संबंधित पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखेपैकी एकाही पथकाला मंगळसूत्र चोर, तोतया पोलिसांच्या घटनेत सुगावा लागू शकला नाही. अनेकदा हिस्ट्रीशीटर, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर संशय व्यक्त केला गेला. इराणी गँगची शक्यता अधिकारी व्यक्त करतात. परंतु आरोपीपर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत. 
 

गस्तीवरील पोलिस गेले कुठे? 
शहरात चोवीस तास गस्तीचा दावा पोलिस विभागाकडून करण्यात येतो. सर्व पोलिस विभाग मिळून असलेल्या ११० दुचाकीपैंकी रस्त्यावर गस्तीसाठी पोलिस ठाण्यांच्या ३८ दुचाकी नेमण्यात आल्या आहेत. यात गुन्हे शाखा, विशेष शाखेसह मुख्यालयाची ४० पेक्षा अधिक पथके, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या दोन पेट्रोलिंग व्हॅन, कंट्रोल रूमचे कर्मचारी, महिला पथक कायम गस्तीवर राहतील असे अपेक्षित धोरण आहे. तसा दावाही विभागाकडून करण्यात येतो. परंतु तुरळक ठिकाणी पोलिस गस्त घालताना दिसतात. काही वाहने ही टपाल वाटप कामासाठी देण्यात आले आहेत. परंतु सकाळी दहा ते बारानंतर ती गस्तीसाठी वापरण्याऐवजी सदर कर्मचाऱ्यांकडेच नाहक दिली गेलेली असतात, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शहरातील गस्तवरील पोलिस गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 

पाच दिवसांतली आठवी, तर महिन्यातील नववी घटना 
२१ ऑगस्ट : गायत्री लक्ष्मण गरुड (३५, रा. जाधववाडी) यांचे जाधववाडीतून ३० हजाराचे मंगळसूत्र हिसकावले. 
२१ ऑगस्ट : मंगला रामेश्वर पुरोहित (५०, रा. एन-११) या सकाळी साडेअकराच्या सुमारास कचरा टाकून परत जाताना अडीच तोळ्याचे मंगळसूत्र चोरीस 
२० ऑगस्ट : सविता नारायण कुलकर्णी (६२, विद्यानगर) या रात्री नऊ वाजता घरासमोर शतपावली करताना ४२ हजारांचे मंगळसूत्र चोरी. 
१९ ऑगस्ट : कल्पना सुभाष भानुसे (४८, रा. श्रीकृष्णनगर) या दुपारी पायी जात असताना पावणेदोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. 
३ ऑगस्ट : संध्या सुभाष रापतवार (६०) या गुलमोहर कॉलनीतून सायंकाळी जात असताना घरासमोर अडीच तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले.  
 

चार दिवसांतली नववी घटना, चार महिन्यांत वीसपेक्षा अधिक, पोलिसांची यंत्रणा कुचकामी 
पहिली चो
री 
स्थळ : आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक. 
वेळ : आठ वाजून ५६ मिनिटे 
तनुजा विपुलचंद कंदी (४८, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) या पतीसह दुचाकीवरून आकाशवाणी चौकातून वळण घेऊन त्रिमूर्ती चौकाच्या दिशेने जात होत्या. त्यांच्या मागे यामाहा एफ झेड दुचाकीवर दोघे पाठलाग करत गेले. रस्ता खराब असल्याने कंदी विपुलचंद यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी करताच मागून आलेल्या दोनपैकी एका चोरट्याने दोन ते तीन सेकंदांमध्ये तनुजा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यात तनुजा यांनी ते हातात पकडून ठेवल्याने १८ ग्रॅमपैकी चोरांच्या हाती ११ ग्रॅम हाती लागले. चाेर त्रिमूर्ती चौकाकडे भरधाव पळून गेले. 
 

दुसरी चोरी 
स्थळ : एसबीएच कॉलनी, न्यू उस्मानपुरा. 
वेळ : नऊ वाजून अठरा मिनिटे 
पहिली घटना घडताच कंट्रोल रूम चोरीची घटना सांगण्यात आली. घटनास्थळी जवाहरनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक दाखल होण्यासाठी निघाले. वॉकीटॉकीवर निरोप पोहोचवून सतर्क करण्यात आले. हे सर्व सुरू असतानाच न्यू उस्मानपुऱ्यातील एसबीएच कॉलनीत दुसरी घटना घडली. जागृती हायस्कूलच्या शिक्षिका जयश्री संदीप देवगावकर (४४, रा. उल्कानगरी) सकाळी मुलाला आयकॉन इंग्लिश शाळेत सोडून दुचाकीवर घराकडे जात असताना भाजीवाली बाई पुतळ्यापासून त्यांनी एसबीएच कॉलनीत प्रवेश केला. त्या वेळी याच चोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांचा पहिला प्रयत्न फसला. मात्र, कॉलनीत एका वळणावर त्यांनी त्यांच्या पुढे जात मागे बसलेल्याने हात दाखवून थांबवले. दुचाकी वळवून त्यांच्याजवळ जात एका झटक्यात १७ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. 
 

तिसरी चोरी 
स्थळ : अयप्पा मंदिर, धावडा कॉम्प्लेक्स 
वेळ : १० वाजून १५ मिनिटे 
दुसरी घटना घडल्याचे कंट्रोल रूममध्ये कळाल्यानंतर त्याची माहितीदेखील वॉकीटॉकीवर देण्यात आली. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणी सुरू केली. परंतु सव्वादहा वाजेच्या सुमारास अय्यप्पा मंदिराजवळ मनीषा अनिल सोमवंशी (रा. छत्रपतीनगर, सातारा) यांच्या पतीचे धावडा कॉम्प्लेक्समध्ये इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. सकाळी त्या दुकानाकडे पायी जात असताना दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. झटका बसून तुटून ते खाली पडताच चोरांनी दुचाकी भरधाव नेली. यात दोन ते अडीच ग्रॅम सोने चोरांच्या हाती लागले 
 

आठ किलोमीटरमध्ये तीन घटना 
८ वाजून ५६ मिनिटाला पहिल्यांदा आकाशवाणी चौकात चोर कैद झाले. त्यानंतर त्रिमूर्ती चौक व त्यानंतर ९ वाजून १० मिनिटांनी अमरप्रीत चौकात कैद झाले. तेथून पुढे काल्डा कॉर्नर ते न्यू उस्मानपुरा गाठला. दहा वाजून १७ मिनिटाला ते थेट अय्यप्पा मंदिर परिसरात कैद झाले. आठ किलोमीटरचा परिसर चोर सव्वा तास फिरत होते. पहिली घटना नऊ वाजता समोर आल्यानंतरदेखील सव्वा तासात पोलिसांना चोरांचा माग काढता आला नाही. 
 

कंट्रोल रूममधून सूचना मिळूनही पसार 
सव्वा तास चोर जालना रस्त्याच्या एका बाजूला मंगळसूत्र, सोनसाखळी चोरण्यासाठी महिलांना हेरत फिरत होते. नऊ वाजेच्या सुमारास वर्णनदेखील पोलिसांना मिळाले. कंट्रोलरूमकडून वॉकीटॉकीवर सतत माहिती देण्यात येत हाेती. परंतु या सव्वा तासात एकाही ठिकाणी त्यांना गाठता आले नाही. आठ किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जवळपास अमरप्रीत चौक, रोपळेकर रुग्णालय, शहानूरमिया दर्गा चौक, संग्रामनगर उड्डाणपूल बीड बायपास चौक, महानुभव आश्रम चौकात वाहतूक पोलिस उभे असतात. एकाही चौकात पोलिसांना ताेंडाला रुमाल बांधलेले दुचाकीस्वार आढळले नाहीत. त्याशिवाय सेफ सिटीतील ८० टक्के कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचे फावले. 

बातम्या आणखी आहेत...