आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- जेट एअरवेजच्या नाशिक- दिल्ली सेवेला स्वातंत्र्यदिनी दाेन महिने पूर्ण झाले असून आत्तापर्यंत तब्बल ५९८६ प्रवाशांनी सेवेचा फायदा घेतला अाहे. नियमितपणे किमान दीड टन कार्गाेचीही वाहतूक झाली असून नाशिकची फळे, भाजीपाला विदेशातील बाजारपेठेत अवघ्या काही तासांत पोहोचू शकला.
चेन्नई, कोलकाता, नागपूर, बंगळुरु सेवेबाबत उद्या चर्चा
जेट एअरवेजने नाशिकमधील क्षमता अाेळखली असून येथून अाता चेन्नई, काेलकाता, नागपूर, बंगळुरू या शहरांना जाेडणारी विमानसेवा सुरू करता येऊ शकेल का या अनुषंगाने मंगळवारी (दि.२१) दुपारी १२ वाजता निमा हाऊस येथे बैठक हाेणार अाहे. जेट एअरवेजचे नॅशनल हेड गिल्बर्ट जाॅर्ज अाणि महाराष्ट्र अाणि गाेव्याचे एरिया मॅनेजर येझ्डी मार्कर तसेच जिल्ह्यातील प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.