आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The Last Assembly Elections, Five Parties Spent 524 Crores On Election Campaigning

मागच्या विधानसभा निवडणुकीत पाच पक्षांकडून ५२४ कोटींचा खर्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद यादव   

मुंबई - २०१४ मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेसारख्या प्रमुख पक्षांनी तब्बल ५२४ कोटी  ५६ लाख ३१,९४५ रुपयांचा खर्च केला होता. निवडणूक आयोगाच्या  आकडेवारीतूनच ही माहिती समोर आली. स्टार प्रचारकांचे हवाई दाैरे, नेत्यांच्या यात्रा, माध्यमांवरील जाहिरातबाजी, बल्क एसएमएस, पोस्टर, बॅनर, स्टिकर यांच्यासह अनेक बाबींवर हे पैसे खर्च करण्यात आले.  स्टार प्रचारकांच्या हवाई दाैऱ्यावर सर्वाधिक ७.५२ काेटी खर्च काँग्रेसने केला.  मुंबई काँग्रेसने १२ लाख ८४८ रुपयांचा वेगळा खर्च केला होता. भाजपने मात्रस्टार प्रचारकांवर एकाही पैशाचा खर्च केला नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३ कोटी ७६ लाख ६१,५२५ रुपयांचा खर्च दाैऱ्यांवर दाखवला. शिवसेनेनेही स्टार प्रचारकांवर २ कोटी १८ लाखांचा खर्च केला.
 

इथेही आघाडी : इतरांपेक्षा भाजपचा चौपट खर्च
२०१४ मध्ये भाजप व शिवसेना स्वबळावर लढले होते. भाजपने १२२ जागांची कमाई केली होती. भाजपने या निवडणुकीतील खर्चाची माहिती २३ जुलै २०१५ ला निवडणूक आयोगाला सादर केली. त्यानुसार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १०५ कोटी खर्च केले. 
 

जाहिरातबाजी : बॅनर, स्टिकर, होर्डिंगवर १३ काेटी
पोस्टर, बॅनर, बॅजेस, स्टिकर, होर्डिंग्ज, कटआऊट आणि झेंड्यांसारख्या प्रचार सामग्रीवरही माेठा खर्च झाला. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या प्रमुख पक्षांनी केवळा या वस्तूंवर १२ कोटी ९५ लाख खर्च केला होता. एमआयएम, सपा, शेकापसह इतर लहान पक्षांचा खर्च यापेक्षा वेगळा हाेता.
 
 

इतर खर्चात राज आघाडीवर 
इतर बाबींवर खर्च करण्याच्या बाबतीत राज ठाकरे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात आघाडीवर होते. 

कुणाचा किती खर्च
मनसे :   2.68 कोटी 78 हजार
राष्ट्रवादी  :  1.12 कोटी 77 हजार
शिवसेना  :  1.28 कोटी 36 हजार
काँग्रेस  :   7.05 लाख 519 
मुंबई काँग्रेस  :   2.94 लाख 345
 

फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीने दाखवला प्रचारसभांचा खर्च
> २०१४ मध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभा घेत वातावरण ढवळून टाकले होते, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, भाजप, शिवसेना आणि मनसेने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत प्रचारसभांवर चक्क शून्य खर्च दाखवला आहे. 
> विश्लेषकांच्या मते ज्या पक्षांनी निवडणूक प्रचारसभा आणि रॅलीवर काहीही खर्च दाखवला नाही, त्यांनी बहुतेक हा खर्च पक्षाच्या खात्यावर न दाखवता संबंधित उमेदवाराच्या खर्चात दाखवला असावा.