आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या काही वर्षांत अभिनेत्रींचे वर्चस्व, ७ मोठे महिलाकेंद्रित चित्रपट रांगेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २६ कोटी मानधन घेणारी दीपिका सर्वात महागडी अभिनेत्री
  • थलाइवीसाठी कंगना रनोटने २४ कोटी रुपये मानधन घेतले होते

मनीषा भल्ला 

मुंबई - महिला प्रधान चित्रपट २०० ते ५०० कोटींचा व्यवसाय करतील, असा काळ फार दूर नाही, असे नुकतेच बॉलीवूडची अभिनेत्री विद्या बालनने म्हटले होते. देशात महिला प्रधान चित्रपटांची संख्या वेगाने वाढत आहे. दीपिका पदुकोनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छपाक चित्रपटाशिवाय पंगा, शकुंतला देवी आणि सायनासह ७ महिलांवर आधारित चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्रींच्या मानधनात वाढ झाली आहे. तज्ञांनुसार, दीपिका पदुकोन एका चित्रपटासाठी सुमारे २६ कोटी रुपये आकारते. थलाइवी चित्रपटासाठी कंगना रनोटने २४ कोटी रुपये मानधन घेतले होते.  चित्रपटाचे कथा सल्लागार संजय मासून सांगतात, चित्रपटासाठी फक्त अभिनेताच हवा, तो काळ राहिलेला नाही. आता प्रेक्षकाला वैविध्य हवे आहे. चित्रपट समीक्षक केतन जोशी सांगतात, पिंक, मणिकर्णिका इत्यादी महिला प्रधान चित्रपटांनी महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला तडा दिला आहे. हिंदीमध्ये महिलांवर आधारित चित्रपटच बनवणार असल्याचे निर्माती शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे. 

बॉलीवूडच्या महागड्या अभिनेत्री


> दीपिका पदुकोण 26 कोटी
> कंगना राणावत 25 कोटी
> प्रियंका चोप्रा 22 कोटी
> करिना कपूर 21 कोटी
> श्रद्धा कपूर 18 कोटी

स्रोत: मीडियम वेबसाइटनुसार