Job / पुढील सहा महिन्यांत ओयो करणार 3 हजार जणांची भरती

ओयोची देशात 300 पेक्षा जास्त शहरांत उपस्थिती 

वृत्तसंस्था

Aug 23,2019 03:53:00 PM IST

नवी दिल्ली - हाॅटेल सुविधा उपलब्ध करून देणारी ओयो कंपनी पुढील सहा महिन्यांत ३ हजार लाेकांची भरती करणार आहे. आपल्या दक्षिण आशिया आणि भारतीय व्यवसायात २०१९ च्या अखेरपर्यंत १,४०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने जाहिरातीमध्ये म्हटले आहे. त्या दृष्टीने कंपनी ही भरती करत आहे. विस्तार, ग्राहकांना सर्वाेत्तम सेवा आणि संपत्ती मालकांना सातत्याने चांगले यश देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असल्याचे जाहिरातीमध्ये म्हटले आहे. या नियुक्त्या विविध व्यावसायिक क्षेत्रांत करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


यामध्ये व्यावसायिक विकास, कार्यान्वयन, सेवा, विक्री आणि उद्याेग भागीदारीचा समावेश आहे. आेयाे हाॅटेल्स अँड हाेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) आदित्य घाेष म्हणाले, पुढील सहा महिन्यांत कंपनी तीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल. आेयाे सध्या देशातील ३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये अस्तित्वात आहे. कंपनीशी दहा हजारपेक्षा जास्त हाॅटेल मालक आणि व्यावसायिक जाेडले गेले असून कंपनीकडे दाेन लाख खाेल्या उपलब्ध आहेत.

X