दिव्य मराठी / Video/ जैन मुनी आचार्य भगवंत श्री विश्वरत्न, सागर सुरेश्वरजी महाराज यांच्या उपस्थितीत दोन हजार जणांनी 'दिव्यमराठी' मतदान प्रतिज्ञा घेतली

'दिव्य मराठी'चा पुढाकार : बलशाली महाराष्ट्रासाठी गणरायांच्या साक्षीने करू मतदानाची प्रतिज्ञा

Sep 07,2019 01:57:00 PM IST


पुणे - यंदा गणेशोत्सवानंतर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका सर्वाधिक औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे गणेशोत्सवात राजकीय फड रंगणार यात शंका नाही. मात्र, ज्या मतदारांच्या बळावर या निवडणुका होतात त्यांनीही सूज्ञ नागरिक म्हणून आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. यासाठी दिव्य मराठीने मतदानाची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक दिव्य मराठीच्या पुढाकाराने पुण्यातील अखिल मंडई गणेश मंडळ याठिकाणी शनिवारी सकाळी दीड ते दोन हजार लोकांनी मतदान प्रतिज्ञा घेतली. जैन मुनी आचार्य भगवंत श्री विश्वरत्न, सागर सुरेश्वरजी महाराज आणि मंडळाचे प्रमुख अण्णा थोरात यांचा उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नवकार जपाचे पठण आणि जैन मुनींचे मार्गदर्शन करण्यात आले.


दिव्य मराठीची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. माझ्यासारख्या बांधवांमुळे या देशात लोकशाही आहे. हा देश कोणत्याही नेत्याचा नाही. तो तुमचा आणि माझा आहे. या देशाची अंतिम सत्ता जनतेची आहे. मी मतदार असल्याचा मला अभिमान आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हा हक्क मी बजावणार आहे. मी कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा नाही. गणरायांच्या साक्षीने आम्ही प्रतिज्ञा करतो की या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारच. त्यातच माझे आणि माझ्या देशाचे सौख्य सामावलेले आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र.

X