Home | National | Delhi | In the real estate, by 2026, there will be 7 lakh crore investment

रिअल इस्टेटमध्ये 2026 पर्यंत 7 लाख कोटी गुंतवणूक होणार

वृत्तसंस्था | Update - Nov 08, 2018, 10:27 AM IST

2030 पर्यंत या क्षेत्राचा विस्तार 73 लाख कोटींवर पोहोचण्याची क्षमता असल्याचे सांगितले गेले.

  • In the real estate, by 2026, there will be 7 lakh crore investment

    नवी दिल्ली - देशातील रिअल इस्टेटमध्ये खासगी क्षेत्रातील गुंतवणूक २०२६ पर्यंत वाढून ७.३ लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक फायदा प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील शहरांना मिळेल. या क्षेत्रात या वर्षी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान खासगी क्षेत्रातील गुंतवणूक २२ हजार कोटी रुपयांपर्यंत राहिली. इंडो-युरोपियन बिझनेस फोरमने (आयईबीएफ) यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला आहे. नुकतेच लंडनमध्ये एक संमेलन झाले. यात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात गतीने वाढणाऱ्या क्षेत्रात रिअल इस्टेट क्षेत्राचा समावेश आहे. २०३० पर्यंत या क्षेत्राचा विस्तार ७३ लाख कोटींवर पोहोचण्याची क्षमता असल्याचे सांगितले गेले.


    आयईबीएफच्या भारताचे प्रमुख सुनीलकुमार गुप्ता म्हणाले की, रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) कायदा, २०१६ सारख्या सुधारणांमुळे घर विकत घेणाऱ्या लोकांच्या हिताचे संरक्षण होत आहे. या क्षेत्रात पारदर्शकताही आली आहे.

    २०३० पर्यंत अर्थव्यवस्थेची क्षमता १० लाख कोटी डॉलर
    आयईबीएफ २०१८ च्या या संमेलनात भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात विकास आणि गुंतवणुकीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २०३० पर्यंत अर्थव्यवस्थेची क्षमता १० लाख कोटी डॉलर म्हणजेच ७३० लाख कोटींची होण्याची क्षमता असल्याचे या संमेलनात म्हटले गेले.

Trending