आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- रोका लंडन गॅलरीच्या वतीने शनिवारी अॅग्रीटेक्चर' नावाचे प्रदर्शन सुरू झाले असून ते १८ मे पर्यंत चालणार आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या जागेवर आधुनिक शेतीची पद्धत दाखवण्यात आली आहे. यामध्ये शहरांतील व्यावसायिक शेतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहरीकरणामुळे लोक शेतीपासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांना शेतीबाबत सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे प्रदूषण कमी करण्यासही मदत होईल. अशा प्रकारच्या शेतीला मायक्रो-फार्मिंग नाव देण्यात आले आहे. व्हर्टिकल फार्मिंगची पद्धत सुमारे १० वर्षे जुनी आहे. मात्र, आता ती नियंत्रित वातावरणात केली जाते.
येथे शहरात अंडरग्राउंड शेतीची माहिती देण्यात आली आहे. ग्रोइंग अंडरग्राउंड नावाची कंपनी लंडनमध्ये ३३ मीटर खाली सलॅडची शेती करत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही जागा बनवण्यात आली होती. जमिनीखाली तापमान १५ अंश से.च्या खाली जात नाही. आठवडाभराच्या आत पीक उगवण्यास सुरुवात होते. पारंपरिक शेतीत वर्षात ७ पिके तयार होतात, या ठिकाणी मात्र ६० पिके घेता येतात.
फ्लोटिंग फार्ममध्ये दुधावर प्रक्रियादेखील केली जाईल
हे फ्लोटिंग फार्म नेदरलँड्सच्या रॉटरडममध्ये आहे. यात गायीदेखील आहेत. येथे दुधावर प्रक्रिया केली जाईल. नागरिक आणि विद्यार्थ्यांना दूध उत्पादनाबद्दल माहिती देणे, यामागचा उद्देश आहे.
पूर्ण वापराच्या वस्तूंचे व्हर्टिकल शेत, सेंद्रिय कचऱ्याचे खत
ग्रीनबेली नावाची कंपनी घरांच्या भिंतींवर व्हर्टिकल शेती तयार करते. ते बनवण्यासाठी पूर्ण वापर करण्यात आलेल्या वस्तू वापरल्या जातात. जवळपासच्या घरांमधून सेंद्रिय खत तयार करून या पिकांना टाकले जाते.
या आत्मनिर्भर गावाच्या घरांवर पारदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प
नेदरलँड्सच्या अल्मेरे मध्ये री-जेन (रिजनरेटिव्ह) गावाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे गाव पूर्णपणे आत्मनिर्भर आहे. येथे पारदर्शी सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे वीज तर तयार होतेच, पण त्याचबरोबर पिकांना सूर्यप्रकाशही मिळतो. ऑफ-ग्रिड म्हणजेच येथे बाहेरून वीजपुरवठा होत नाही.
पुढील स्लाइडवर पाहा Photos...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.