आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलाइनमध्ये काडी; घाबरलेल्या नातेवाइकांनी केले रुग्णाचे सीटी स्कॅन, अहवाल पाठवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - येथील  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील पुरुष वैद्यकीय कक्षात न्यूमोनियाचे उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकास   चढवलेल्या सलाइनमध्ये चक्क काडी दिसून आल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाइकांनी रुग्णांचे सीटी स्कॅन केले असून अहवाल कधी येतो, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. रुग्णालय अधीक्षकांनी संदिग्ध सलाइनची पूर्ण बॅच रद्द  करत  अहवाल अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत, तर अधिष्ठातांनी सलाइनच्या बाटल्या तपासूनच लावण्याचे आदेश  रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दिलेत. डीजे फार्मास्युटिकल कंपनीच्या एक हजार सलाइनच्या बाटल्या स्वारातीच्या भांडारात जमा केल्या. अन्न औषध प्रशासनाचा अहवालानंतर बाटल्या ठेवायच्या की नाही यावर निर्णय होणार आहे.  


 आसरडोह  (ता. धारूर) येथील  वसंत  नागोराव देशमुख  (४०)  मागील तीन दिवसांपासून  स्वाराती उपचार घेत आहेत. 

 

‘त्या’ बाटल्या वापरू नयेत  
डीजे फार्मास्युटिकल कंपनीच्या एक हजार सलाइनच्या बाटल्या स्वारातीच्या भांडारात जमा केल्या असून अन्न औषध प्रशासनाचा अहवाल आल्यानंतर “त्या’ बाटल्या नष्ट करायच्या की ठेवायच्या याबाबत निर्णय होणार आहे. अंबाजोगाई येथील  स्वाराती रुग्णालयाकडून ई-टेंडरद्वारे रुग्णालयास लागणारी  औषधे मागवण्यात येत असून अंदाजे पाच ते सात रुपयांची सलाइनची एक बाटली आहे. त्या बॅचच्या  एक हजार बाटल्या वापरू नयेत अशा कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यात. 

 

चौकशी करण्यात येईल  
गांभीर्याने रुग्णाची तपासणी केली. त्या सलाइन बाटल्यांची संपूर्ण बॅच रद्द केली असून त्याचा संपूर्ण अहवाल अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले. वॉर्डात ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांनी सलाइनची बाटली  तपासून रुग्णास देणे आवश्यक होते. जर कोणी डॉक्टर रुग्णास उद्धटपणे बोलले असेल  तर त्यांची चौकशी होईल.

डॉ. राकेश जाधव, अधीक्षक, स्वाराती रुग्णालय,अंबाजोगाई.

 

बाटल्या तपासूनच लावण्याचे आदेश  
सलाइनच्या बाटलीत काडी आढळली असली तरी त्या बॅचच्या इतर  बाटलीत काहीही आढळून आले नाही. तरी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व वाॅर्डातून त्या बॅचच्या सर्व बाटल्या जमा केल्या. सलाइनच्या बाटल्या तपासूनच लावण्याचे आदेश दिले.
डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, स्वाराती.   

बातम्या आणखी आहेत...