आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय अभ्यासक्रमात \'जलव्यवस्थापन\' समाविष्ट होणार; शिक्षण संचालकांची पाठ्यपुस्तक निर्मिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शालेय अभ्यासक्रमात विविध विषयांसह जलव्यवस्थापन विषयाचा समावेश करण्याची शिफारस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे केली. विशेष म्हणजे हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाच्या गट नेत्या ॲड. धनश्री देव-अभ्यंकर यांनी १२ जानेवारी २०१८ रोजी केली होती. 

 

'पाण्याचे व्यवस्थापन' काळाची गरज आहे. इस्रायल भारताच्या तुलनेत १० टक्केच पर्जन्यमान होत असतानाही योग्य पाणी व्यवस्थापनातून त्या देशाने नंदनवन फुलवले. त्या देशात एकदा नळातून बाहेर पडलेलं पाणी सात वेळा प्रक्रिया करून पुनर्वापर करूनच जमिनीत मुरवले जाते. त्यांचे अनुकरण भारतात का केले जात नाही? येथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो. तरीसुद्धा या देशात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने पाण्याचे व्यवस्थापन हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशी मागणी करणारे निवेदन सप्टेंबर २०१७ मध्ये ॲड. धनश्री देव-अभ्यंकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले होते.

 

त्यांच्या पत्रानुसार शिक्षण संचालकांकडे राज्य शासनाने शिफारस केली होती. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे पाणी व्यवस्थापनासह विविध विषयांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याबाबत योग्य ती कार्यवाहीची विनंती करणारे पत्र पाठवले आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...