आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In The World, Samosa Has Been Search 13 Thousand Times, Chicken Biryani 15 Thousand Times Daily

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात समाेसा राेज १३ हजार वेळा, चिकन बिर्याणीचा १५ हजार वेळा शाेध घेतला गेला

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पालक पनीर, डोसा, चाट, दाल मखनी, तंदुरी चिकन अव्वल १० शाेधामध्ये
  • जागतिक बाजारपेठ संशाेधन कंपनी सेमर्शनचा खाद्यपदार्थ संशाेधन अहवाल

बोस्टन - समोसा, चाट, बटर चिकन आणि चिकन बिर्याणी अशा भारतीय पदार्थांचे जगात वर्चस्व आहे. अमेरिकेतील जागतिक बाजारपेठ संशोधन कंपनी सेमर्श यांनी एक ऑनलाइन खाद्यपदार्थ शाेेध अहवाल जाहीर केला आहे. जगभरात चिकन बिर्याणीचा दर महिन्याला ४.५६ लाख वेळा सर्च करण्यात आला. तर, राेज १३ हजार वेळा समाेसा सर्च करण्यात आला असल्याचे अहवालात म्हटले आहे. बटर चिकन, चिकन टिक्का मसाला, डोसा, तंदुरी चिकन, पालक पनीर, नान, दाल माखनी आणि चाट हेही या यादीमध्ये पहिल्या दहामध्ये होते. बटर चिकन या पंजाबी डिशची महिन्याला ४ लाख वेळा शोध घेतला. त्याशिवाय चिकन टिक्का मसाला सरासरी २.५ लाख वेळा शोधला गेला. दक्षिण भारतातील डोसाचा शोध २.२८ लाख वेळा घेण्यात आला.परदेशात भारतीयांनी मिळवून दिली ओळख


सेमर्शचे संपर्क प्रमुख फर्नांडाे अंगुलाे म्हणाले, आम्हाला हा परिणाम बघून आश्चर्य झाले नाही. याचे कारण विदेशात राहणाऱ्या भारतीय प्रवाशांनी आपले खाद्यपदार्थ दूरपर्यंत पाेहोचवले आहेत. परदेशात राहणाऱ्यांमध्ये पंजाबींची संख्या जास्त आहे. त्यामुळेही भारतीय खाद्यपदार्थ शाेधामध्ये अव्वल आहेत.