आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात सोमवारी मुलांना दिली जाते विशेष सवलत, आवडणाऱ्या मुलीसोबत करु शकतात ही कामे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकांसाठी सोमवारचा दिवस खुपच कंटाळवाणा असतो. रविवारच्या सुट्टीनंतर दुसऱ्यादिवशी शाळेत जाणे, कामावर जाणे किंवा कामे करणे अनेकांना आवडत नाही. त्यांच्यासाठी सोमवारची सकाळ म्हणजे एक डोकेदुखीच असते. परंतु जगात असे काही देश आहे जिथे सोमवारचा दिवस एखाद्या उत्सवासारखा आहे. या देशामध्ये सोमवारी मुलांना एक विशेष सवलत दिली जाते.  

मध्य युरोपीय देशांमध्ये पोलंड, चेक गणराज्य आणि पुर्वीय देश युक्रेनमध्ये सोमवारी मुलांना मज्जेशीर सवलत दिली जाते. या दिवशी मुले आपल्या आवडत्या मुलींना पाण्याने भिजवू शकतात. या परंपरेचे कारणही तेवढेच विचित्र आहे.

 

एकमेकांवर पाणी फेकण्याची प्रथा

> या देशांमध्ये ख्रिश्चन धर्म स्विकारल्यानंतर वेट मंडे (ओला सोमवार) साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. ईस्टरच्या सोमवारी तिथिल लोक एकमेकांवर पाणी फेकतात. या दिवशी एकमेकांवर पाणी फेकल्याने सर्व पाप धुतली जातात असा येथील लोकांचा समज आहे. परंतु एका विशिष्ट कारणामुळे मुलांना विशेष सवलत दिली जाते.

 

सोमवारचा दिवस म्हणजे मज्जा करण्याचा दिवस

> या प्रथेमागे एक मोठी परंपरा आहे. एखाद्या गावातील सर्वात सुंदर मुलीला पाण्याने भिजवले आणि त्या मुलीने त्याचा विरोध केला नाही तर तुमचे सगळे पाप धुतले जातात. असा या देशातील लोकांचा विश्वास आहे. या प्रथेमध्ये काळासोबत अनेक बदल होत गेले. आता येथील मुले कोणत्याही मुलींवर पाणी फेकतात. या खेळात अनेकवेळा पाण्याच्या बादल्या फेकत असताना गाड्यांच्या काचादेखिल फुटल्या आहे. अशाप्रकारे या देशांतील लोक पाण्याचा मजेदार खेळ खेळून सोमवारचा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...