1300 वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरमधील / 1300 वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरमधील या मंदिरात वर्षातून दोन वेळा सूर्यदेवही घेतो लक्ष्मीदर्शन

पहिला दिवस: पायापर्यंत पहिला दिवस: पायापर्यंत
दुसरा दिवस: कमरेपर्यंत दुसरा दिवस: कमरेपर्यंत
तिसरा दिवस: मस्तकापर्यंत तिसरा दिवस: मस्तकापर्यंत
Nov 07,2018 07:55:00 AM IST

कोल्हापूर - जवळपास १३०० वर्षे जुन्या सर्वात प्राचीन महालक्ष्मी मंदिरामध्ये दररोजच दिवाळी उत्सवाप्रमाणे वातावरण असते. त्यामुळे दरदिवशी अंदाजे ४० हजार भक्तांना हे मंदिर आकर्षित करत असते. मंदिराची वास्तू अप्रतिम अशी आहे. येथे वर्षातून दोन वेळा म्हणजेच नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये तीन दिवसांपर्यंत सूर्याची किरणे गाभऱ्यातील महालक्ष्मीच्या मूर्तीपर्यंत पोहोचतात. नोव्हेंबरमधील ९, १० आणि ११ तारखेला आणि यानंतर ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारीला हा किरणोत्सव साजरा होतो. पहिल्या दिवशी सूर्यकिरणे महालक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत, तर तिसऱ्या दिवशी ही किरणे चेहऱ्यापर्यंत पोहोचतात. या सर्व प्रक्रियेला किरणोत्सव म्हणतात.

याचा अनुभव घेण्यासाठी हजारो भक्त कोल्हापूरला येतात. गाभाऱ्यामधील मूर्ती आणि मंदिर परिसरातील पश्चिम दिशेतील दरवाजामधील अंतर २५० फुटांपेक्षा अधिक आहे. किरणोत्सवाच्या काळात परिसरातील विजेचे दिवे बंद करण्यात येतात.

काळ्या पाषाणावर केलेले नक्षीदार काम हजारो वर्षे जुन्या भारतीय स्थापत्यकलेचा अद््भुत नमुना आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात महालक्ष्मीची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या दोन वेगळ्या गाभाऱ्यांत महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. पश्चित महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव येथे देखभालीचे काम पाहतात. ही त्यांची नववी पिढी आहे. ते म्हणाले की, देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. दिवाळीच्या रात्री २ वाजता मंदिराच्या शिखरावर दिवे लावले जातात. पौर्णिमेपर्यंत हे दिवे नियमित प्रज्वलित राहतात.

मंदिरात दीपोत्सव सुरू असल्याचा हा संदेश आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण परिसर दिव्यांनी उजळून निघतो. नवरात्रोत्सवही दिवाळीप्रमाणे विशेष असा असतो. या काळात दररोज देवीला पालखीत बसवून परिसरात परिक्रमा केली जाते. नवरात्रातील पंचमीला महालक्ष्मीला सोन्याच्या पालखीत बसवून ७ किमी अंतरावर त्र्यंबोली देवीच्या भेटीला नेले जाते. इतर वेळी मात्र पहाटे ४ पासून महालक्ष्मीचे नियमित दर्शन सुरू होते. देशभरातून आलेल्या भक्तांची रांग मंदिराच्या बाहेरपर्यंत असते. ८.३० वाजता देवीला स्नान करवले जाते. त्यानंतर पूजारी देवीचा शृंगार करतात. ११.३० वाजता दुसऱ्या स्नानाची वेळ होते.

देवी पुन्हा एकदा नव्या रूपात सजलेली दिसते. कधी पैठणी, तर कधी कांजीवरम व कधी पेशवाई रंगीत साडी देवीला परिधान केली जाते. रात्री ९ वाजता निद्रा आरतीसह मंदिराचे पट बंद होतात. पुराणानुसार, महालक्ष्मी पूर्वी तिरुपतीमध्ये विराजमान होती. भगवान विष्णूंशी भांडण झाल्यानंतर रुसून ती कोल्हापूरमध्ये आली. यामुळे प्रत्येक दिवाळीत तिरुपती देवस्थानाकडून महालक्ष्मीसाठी शालू पाठवला जातो.

पुढील स्लाईडवर पहा,...सूर्यदर्शनाचे आणखी छायाचित्र...

X
पहिला दिवस: पायापर्यंतपहिला दिवस: पायापर्यंत
दुसरा दिवस: कमरेपर्यंतदुसरा दिवस: कमरेपर्यंत
तिसरा दिवस: मस्तकापर्यंततिसरा दिवस: मस्तकापर्यंत