आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना गमावले सर्वाधिक ११ सामने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत व विंडीज अाज तिसरा व अखेरचा सामना

मुंबई- भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी मुंबईत खेळवला जाईल. सध्या मालिका १-१ ने बरोबरीत आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करताना  हार पत्करावी लागली. विंडीजने तिसरा सामना जिंकल्यास, तो भारताविरुद्ध पहिल्या टी-२० मालिका आपल्या नावे करेल. दुसरीकडे, टीम इंडिया येथे सामना जिंकून सलग तिसऱ्या विंडीज विरुद्ध मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. प्रथम फलंदाजी करताना भारतीय टीमचे टी-२० मध्ये चांगले प्रदर्शन राहिले नाही. २०१६ विश्वचषकानंतर क्रमवारीतील अव्वल पाच संघांबाबत बोलायचे झाले तर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक ११ सामने गमावले. कोहलीची प्रथम फलंदाजी करताना सरासरी सुमार 
 
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या  कर्णधार विराट कोहली १७ डावात २४ च्या सरासरीने केवळ ३६५ धावा करू शकला. एक अर्धशतक ठोकले. पाठलाग करताना कोहलीने १२ डावात ८० च्या सरासरीने ५५७ धावा काढल्या. यात ६ अर्धशतक झळकावले. म्हणजे सरासरी ५६ ची सरासरी आहे. 
रोहितने प्रथम फलंदाजी करताना २० डावात ३५ च्या सरासरीने ६७२ धावा केल्या. यात २ शतके, ४ अर्धशतके. असून पाठलाग करताना २२ डावांत ३० च्या सरासरीने ५९८ धावा केल्या. यात १ शतक व ४ अर्धशतके आहेत. टी-२०मध्ये दाेन्ही खेळाडूंच्या नावे सारख्या धावा आहेत.आपले गोलंदाज कमाल करू शकणार नाही


दोन्ही सामन्यांचा विचार केल्यास भारतीय गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली नाही. बांगलादेश विरुद्ध टी-२० मालिकेत चमकलेला वेगवान गोलंदाज दीपक चाहर केवळ एक बळी घेऊ शकला. भुवनेश्वरला एकही बळी मिळाला नाही. त्याने ९ च्या इकोनॉमीने धावा दिल्या. आॅफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने २ बळी घेतले.विश्वचषकात विंडीजकडून या मैदानावर भारत पराभूत


भारत व विंडीज यांच्यात वानखेडेमध्ये एक टी-२० सामना  झाला. २०१६ टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत विंडीजने भारताला हरवले होते. सामन्यात सिमन्सने नाबाद ८२ धावांची खेळी करत संघाला विजयी केले.  विंडीजने त्यासह मैदानावर इंग्लंडला देखील हरवले. त्यामुळे या मैदानावर विजयाचा रेकॉर्ड १०० टक्के आहे.