आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत ९ हजार फूट शिखरावर शहर वसवले, किम उन यांच्या हस्ते उद्घाटन

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
सामजियोन प्रांतात हे आधुनिक शहर किम यांच्या निगराणीखाली वसवण्यात आले आहे. - Divya Marathi
सामजियोन प्रांतात हे आधुनिक शहर किम यांच्या निगराणीखाली वसवण्यात आले आहे.

प्योंगयांग - उत्तर कोरियात मंगळवारी हुकूमशहा किम जाेंग उन यांनी सामजियोन प्रांतात नवीन शहराचे उद‌्घाटन केले. ही देशाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. येथेच त्यांचे वडील व माजी शासक जाँग इल यांचा जन्म झाला होता. नवीन शहर देशातील सर्वात पवित्र स्थळ माऊंट पाएक्टुमध्ये वसवले आहे. आधुनिक संस्कृतीचे ते प्रतीक मानले जात आहे. शहरात अपार्टमेंट, हॉटेल, स्की रिसोर्ट, व्यावसायिक, सांस्कृतिक केंद्र, रुग्णालय आणि स्टेडियमही आहे. किम यांनी दोन वर्षांपूर्वी शहराबद्दलची घोषणा केली होती. हे शहर दक्षिण कोरियापेक्षा वेगळे आहे, असे दाखवण्याची उन यांची इच्छा होती. येथे अत्यंत स्वच्छ व चांगली डिझाइन केलेल्या अनेक इमारती साकारल्या आहेत. अशी आधुनिक नगरी देशातील कोणत्याही शहरात पाहायला मिळत नाही. संपूर्ण शहर ९ चौरस किमी आहे. त्यावरील खर्चाचा तपशील मात्र समजू शकला नाही. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत उन यांनी स्वत: च निगराणी ठेवली होती. दोन वर्षांत त्यांनी या भागाला १०-१२ वेळा भेट दिली होती. 

३८० रहिवासी-व्यावसायिक इमारती तयार, ४ हजारांवर उंबरे   

  • क्रांतिकारी इतिहासावर आधारित संग्रहालय, हिवाळी क्रीडा प्रशिक्षण केंद्रही बनवले.
  • ब्ल्यूबेरी व बटाट्यावरील प्रक्रिया केंद्रासह १० हजार अपार्टमेंट बनवले आहेत.
  • प्रकल्पाचा तिसरा व अखेरचा टप्पा २०२० पर्यंत पूर्ण होणे शक्य.
बातम्या आणखी आहेत...