आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनमध्ये वाईट कामगिरी, भ्रष्टाचारामुळे राष्ट्रपतींनी संपूर्ण मंत्रिमंडळ केले बरखास्त, ‘पाश्चात्त्यांची गुलामगिरी करू नकाे’

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

अँड्र्यू इ क्रॅमर | माॅस्काे
 
युक्रेनचे राष्ट्रपती वाेलाेदिमिर जेलेन्की यांनी वाईट कामगिरी व भ्रष्टाचाराच्या आराेपांमुळे संपूर्ण मंत्रिमंडळाला बरखास्त केले. त्याशिवाय त्यांनी परदेशींना कंपनीच्या कार्यकारी मंडळावर नियुक्त केल्याबद्दल आपल्या मंत्र्यांना दाेषी ठरवले. त्यात आराेग्यमंत्री जाेरयाना स्कालेस्तका यांचाही समावेश आहे. त्यांना चीनहून परतल्यानंतर काेराेनाच्या संशयावरून स्वतंत्र ठेवण्यात आले हाेते.  

जेलेन्स्की यांनी यानिमित्ताने संसदेला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, संसद बरखास्त करणे हा माझा नाइलाज झाला आहे. कारण हे लाेक पश्चिमेकडील राष्ट्रांचे गुलाम बनत चालले हाेते. या देशांनी आर्थिक मदतीच्या नावाने कंपन्यांत घुसखाेरी केली. आंतरराष्ट्रीय सहकारी राष्ट्रांना मी मदतीबद्दल धन्यवाद देईल. परंतु मंडळावर असलेले देशातील नागरिक स्वत:ला तेथे अल्पसंख्याक समजू लागले आहेत. अशी कार्यकारी मंडळावरील सदस्यांची स्थिती आहे. ही गाेष्ट त्यांना समजावी, असे आम्हाला वाटते. आमच्या मंत्र्यांची कामगिरी वाईट राहिली आहे. परंतु सहा महिन्यांच्या कार्यकाळात काेणीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले नाही हे आमचे सुदैव म्हणावे लागेल.

जेलेन्की, ७३.२२ मते मिळवून विजय जेलेन्स्की आधी विनाेदी कलावंत म्हणून लाेकप्रिय हाेते. त्यांची केव्हर्टल-९५ नावाची एन्टरटेन्मेंट कंपनी आहे. त्याची टीव्ही मालिका ‘सर्व्हंट आॅफ द पीपल’मध्ये जेलेन्स्की यांनी राष्ट्रपतींची भूमिका केली हाेती. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना ७३.२२ टक्के मते मिळाली हाेती.  

भ्रष्टाचार राेखण्यासाठी मित्राच्या बँकेचेदेखील राष्ट्रीयीकरण केले
जेलेंस्की यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला मदत करणाऱ्या बँकेचे राष्ट्रीयीकरण केले. त्यांचे मित्र इहोर कोलोमोइस्की यांच्या मालकीचे ते होते. ते युक्रेनचे मीडिया व बँकिंग क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. आयएमएफने मदतीच्या बदल्यात बँक बोर्डात परदेशी सदस्यांना स्वतंत्र संचालक म्हणून स्थान देण्याची अट घातली होती. जेलेंस्की यांना हा प्रस्ताव अमान्य होता. त्यांनी भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी बँकेचे राष्ट्रीयीकरण केले. 

बातम्या आणखी आहेत...