आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरामध्ये वाळू तस्करांचा ‘महसूल’च्या पथकावर हल्ला, नायब तहसीलदार गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- शिवना नदीपात्रातील मांडकी येथे तस्करांकडून होत असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर १५० ते २०० लोकांच्या जमावाने तुफान दगडफेक केली. रविवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान घडलेल्या या घटनेत नायब तहसीलदारांसह ५ कर्मचारी जखमी झाले आहेत.

 

वैजापूर तहसील कार्यालयाचे वरिष्ठ नायब तहसीलदार रमेश भालेराव यांना शिवना नदीपात्रात वाळूचा उपशाची माहिती मिळाली. सायंकाळी पथकासह ते नदीपात्रात आले असता दोन वाहनांत वाळू भरली जात असल्याचे दिसले. त्यांनी वाहनचालकांना तहसीलमध्ये वाहन घेण्याच्या सूचना केल्या. मात्र चालकांनी फोन करून इतर लोकांना कळवल्यानंतर शंभर ते दीडशे लोकांचा जमाव या ठिकाणी चालून आला. त्यांनी दमबाजी सुरू केली. मात्र पथकप्रमुख भालेराव हे कारवाईच्या भूमिकेवर ठाम होते. यामुळे लोकांनी पथकाला घेराव घातला. 

 

 

नदीपात्रात तासभर संघर्ष
नदीपात्रात महसूल अधिकारी विरुद्ध माफियांत तासभर संघर्ष चालला. यात पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली. पथक पळवून लावण्यासाठी तुफान दगडफेक झाली. यात भालेराव यांचा हात फ्रॅक्चर झाला असून संतोष जाधव, श्रीकांत म्हस्के, विलास लांडगे, सचिन गायकवाड हे कर्मचारीही जखमी झाले आहेत

 

बातम्या आणखी आहेत...