आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

120 दिवस इनअॅक्टिव असलेले अकाउंट झाले बंद, काश्मिरी यूजर्सनी शेअर केले स्क्रीनशॉट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हॉट्सअॅप पॉलिसीनुसार 120 दिवस इनअॅक्टिव अकाउंट बंद केले जातात

गॅजेट डेस्क- काश्मीरमधील व्हॉट्सअॅप यूजर्सचे अकाउंट डिअॅक्टिवेट होत आहेत. यातच यूजर्स अकाउंट डिअॅक्टिवेट झाल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यूजर्स सोशल मीडियावर तक्रार करत आहे की, त्यांचे अकाउंट डिअॅक्टिवेट होत आहेत आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमधील यूजर्स ऑटोमॅटिक लेफ्ट होत आहेत. बजफीडच्या रिपोर्टनुसार काश्मीरमध्ये काही महिन्यांपासून इंटरनेट बंद आहे. त्यामुळे युजर व्हॉट्सअॅप वापरू शकत नाहीयेत आणि त्यामुळेच अकाउंट बंद होत आहेत.

काय आहे व्हॉट्सअॅप पॉलिसी
व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार व्हॉट्सअॅप अकाउंटवर 120 दिवसांपर्यंत कोणतीच अॅक्टीव्हीटी झाली नाही, तर असे अकाउंट बंद केले जातात. काश्मीरमध्ये काही महिन्यांपासून इंटरनेट बंद आहे, त्यामुळे तेथील नागरिकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...