आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर निवडणूक कार्यालयात आचारसंहिता बाबत उदासीनता, लोकप्रतिनिधींच्या नावाचे फलक जैसे थे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निलेश पाटील

नवापूर - राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची घोषणा दुपारी बारा वाजता करण्यात आली. या घोषणेबरोबरच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना देखील नंदुरबारमधील नवापूर तहसील कार्यालयातच पहिल्याच दिवशी विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडेच पडले होते. इच्छुकांनी लावलेले होर्डिंग मात्र त्वरित काढून घेण्याची दक्षता राजकीय नेत्यांनी घेतली असली, तरी राजकीय कार्यालयावर झेंडे व बॅनर दिसून आले. 

आचारसंहितेची अंमलबजावणी केली जात असलेल्या प्रशासकीय कार्यालयातच आचारसंहितेचे पालन होत नाही. याठिकाणी राजकीय लोकांचे फलक सुस्थितीत दिसून आले. निवडणूक आयोगाचे जाहिरातीचे बॅनर मात्र फाटलेल्या अवस्थेत दिसून आले. निवडणूक शाखेत देखील कोणता कर्मचारी दिसला नाही. नवापूर प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात विकासकामांच्या फलकांकडे अजूनही कुणाचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात निवडणूक शाखेतील कर्मचारी यांना विचारले असता शहरात फलक काढण्याचे काम सुरू आहे. कर्मचारी जेवणाला गेल्याने कर्मचारी कार्यालय नसल्याचे सांगितले.

काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या संपर्क कार्यालयाचे फलक, राजकीय नेत्यांचे छायाचित्र त्वरित झाकण्याची दक्षता घेतली आहे, तरीही अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रणित संघटना, सामाजिक संस्था यांनी मात्र अजूनही फलक तीन वाजेपर्यंत झाकलेली नव्हती. 

बातम्या आणखी आहेत...