आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाचे उद्घाटन ना. धों. महानोर यांच्या हस्ते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेल्या वर्षी घडलेले महाभारत लक्षात घेता उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी सावध भूमिका घेत ज्येष्ठ निसर्गकवी ना. धों. महानोर यांना संमेलनाच्या उद्घाटकाचा मान देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी अधिकृत माहिती शुक्रवारी संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली. त्यामुळे उद्घाटक कोण, हा सस्पेन्स संपला असून कवी महानोर यांनी संमेलन आयोजकांचे निमंत्रण स्वीकारले आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

तावडे म्हणाले, 'मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेल्या पन्नास वर्षांपासून मोहिनी घालणारे रानकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दहा जानेवारी २०२० रोजी होईल. उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...