आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात माेठ्या इस्तंबूल विमानतळाचे उद‌्घाटन; 19 हजार एकरांत विस्तार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्तंबूल - तुर्कीच्या इस्तंबूल शहरात तयार हाेत असलेल्या जगातील सर्वात माेठ्या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण झाला अाहे. त्याच्या लाेकार्पणासाठी देशाचा ९५ वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम या वेळी राजधानी अंकाराएेवजी इस्तंबूलमध्ये झाला. १८ देशांच्या ५० पेक्षा जास्त नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती तय्यप एर्दाेगन यांनी साेमवारी या विमानतळाचे लाेकार्पण केले. या विमानतळावरून ३१ अाॅक्टाेबरपासून अांतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू हाेती.

 

काळ्या समुद्रकिनाऱ्यावर बनत असलेल्या या विमानतळावर पहिल्या टप्प्यात दाेन धावपट्ट्यांवरून ९ काेटी विमान प्रवाशांची व्यवस्था केली जाईल. सन २०२३ मध्ये या विमानतळाची क्षमता २० काेटी प्रवासी इतकी हाेईल. हे विमानतळ १९ हजार एकर जागेवर पसरलेले असून, येथून २५० विमाने ३५० हून जास्त शहरांसाठी उड्डाण घेतील. पहिल्या टप्प्यात ५४ हजार काेटींचा खर्च अाला, तर एकूण खर्च ८८ हजार काेटी रुपये अाहे.  


उद्देश- इस्तंबूलला पर्यटक हब बनवणे : इस्तंबूल येथे सर्वात माेठ्या विमानतळाच्या निर्मितीमागे पर्यटक हब बनवून अार्थिक विकास साधणे, हा मुख्य हेतू अाहे. या विमानतळाच्या संचालनातून देशाची अर्थव्यवस्था सुमारे ५ % वाढेल, अशी अपेक्षा तुर्कीला अाहे. सध्या तुर्कीत १७ काेटी प्रवासी येतात. त्यात इस्तंबूलची भागीदारी ३१ % असून, येथून २५५ अांतरराष्ट्रीय उड्डाणे संचालित हाेतात. 

 

अॅटलांटा विमानतळ    इस्तंबूल विमानतळ (२०२३ पर्यंत)  

- प्रवासी व विमानांच्या संचालनात अॅटलांटा हे जगातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ अाहे.  
- येथून वार्षिक १० काेटींहूनही जास्त प्रवासी येत-जात असतात. याशिवाय ९.५ लाख उड्डाणे संचालित हाेतात.  
- अॅटलांटा विमानतळावरून राेज सरासरी हजार उड्डाणे संचालित हाेतात. येथे पाच धावपट्ट्या अाहेत.  

- हे २०२३ पर्यंत जगातील सर्वात जास्त विस्ताराचे विमानतळ असेल. २००० उड्डाणे संचालित हाेतील.  
- याची प्रवासी क्षमता २० काेटी हाेईल व येथे सहा धावपट्ट्या असतील. जगात सर्वात जास्त.  
- ७० हजार कार पार्किंगची व्यवस्था. यासह ५३ हजार चाैरस मीटर जागेवर शाॅपिंग काॅम्प्लेक्सही साकारेल.  

 

हायटेक फीचर्स आणि अाकर्षक अंतर्गत सजावट  
- विमानतळाच्या अंतर्गत सजावटीत इस्लामिक कलेचा वापर केला अाहे. येथे ‘ट्यूलिप’च्या अाकाराच्या हवाई वाहतूक नियंत्रण टाॅवरला २०१६ मध्ये अांतरराष्ट्रीय वास्तुशास्त्राचा पुरस्कार मिळालेला अाहे.  

- विमानतळावर प्रवाशांना माेबाइल अॅप व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सुविधा दिल्या जाणार.  
- यामुळे प्रवाशांच्या चेक-इनदरम्यान सामानाचे लवकर स्कॅनिंग हाेऊ शकेल. अाॅनलाइन चेक-इनचा पर्यायसुद्धा मिळू शकेल.  
- प्रवाशांना शाॅपिंगदरम्यान कपडे, घड्याळ अादी घातल्यानंतर मॅजिक मिरर अॅप लूकदेखील सांगेल.  
- ४० हजार एलईडींतून प्रवाशांना विमानापर्यंत जाण्याचे व विमानतळातून बाहेर पडण्याचे संकेत मिळतील.  
- जगातील सर्वात माेठे करमुक्त शाॅपिंग काॅम्प्लेक्सही असेल.   
- ३१ अाॅक्टाेबरपासून पहिले अांतरराष्ट्रीय उड्डाण तुर्कीपासून उत्तर सायप्रससाठी सुरू हाेईल.  
- या प्रकल्पात सुमारे ३५ हजार कर्मचारी व ३ हजार अभियंते सहभागी हाेते. निर्मितीदरम्यान ३७ जणांचा मृत्यू झाला अाहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...