आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिलेश पाटील
नवापूर- क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची शारिरीक,मानसिक, बौध्दिक प्रगती होत असते. स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थीनी सहभागी झाले पहिजे. क्रीडा क्षेत्रात वावरताना नेहमी जय-पराजयाचा सामना करावा लागतो त्यामुळे एका विजयाने भारावून जाऊ नये किंवा दुसर्याने पराजयाने खचू नये. नेहमी सातत्य ठेवून आयुष्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न शिल राहिले पाहिजे. आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी क्रीडा जागतिक पातळीवर नावलौकिक करावे, असे मत उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद भारूड यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रमुख पाहुणे तळोदा प्रकल्पधिकारी अविनाश पांडा, नंदुरबार प्रकल्पधिकारी वसुमना पंत, नाशिक विभागाचे माडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, संभाजी जगताप आदि क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांच्या अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल खामगाव नंदुरबार येथे सोमवारी करण्यात आले. या प्रकल्पास्तरीय स्पर्धेत नवापूर नंदुरबार व शहादा तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील 975 विद्यार्थींनी भाग घेतला होता यात व्हॉलीबॉल, हॅण्डबाॅल, कबड्डी, खो-खो हे सांघिक खेळ व वैयक्तिक खेळात 100, 400, 800, 1500, 3000 मीटर धावणे, रिले, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडी आदी क्रीडा प्रकार घेण्यात आले. खेळत एकूण 72 संघाचा समावेश करण्यात आला.
या स्पर्धेत नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थीनी हॅन्डबाॅल बाजी मारून नाशिक विभागीयस्तरावर निवड करण्यात आली. या कार्यक्रम सूत्रसंचलन एन एम साबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी बी देसाई, किशोर गोसावी, संजय काकडे, बी एफ वसावे,सी जी पाटील, आर एन निकम, व्ही व्ही सोनार, पी एम वसावे, डी एच माळी, डी जी माळी, एस आर पाटील, आर जे मुसळे, एन आर माळी आदि आश्रम शाळेतील मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.