आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Incognito Mode Soon To Be Roll Out In Google Map, Provide Better Privacy On Your Location Data For Users

लवकरच गूगल मॅपमध्ये येईल इन्कॉग्निटो मोड, आपले लोकेशन ठेवू शकता गोपनीय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- गूगल मॅपमध्ये लवकरच इन्कॉग्निटो मोड येणार आहे. या मोडच्या मदतीने यूजर्स आपल्या लोकेशनची माहिती गोपनीय ठेवू शकतील. एक्सडीए डेव्हलपर्सच्या रिपोर्टनुसार कंपनी मॅपच्या इन्कॉग्निटो मोडची टेस्टिंग अँड्रॉयड अॅपमध्ये करत आहे. या फीचरला लवकरच ग्लोबली लॉन्च केले जाईल. लॉन्चिंगच्या वेळी मॅपमध्ये गूगल क्रोमच्या इन्कॉग्निटो मोडप्रमाणेच सगळे प्रायव्हसी फीचर्स पाहयला मिळतील.आय-फ्री वॉकिंग नॅव्हीगेशन मोडदेखील येईल
रिपोर्टनुसार गूगल मॅपच्या 10.26 व्हर्जनमध्ये नवीन 'आय-फ्री' वॉकिंग नॅव्हीगेशन मोडदेखील पाहायला मिळेल. आय-फ्री मोडच्या मदतीने यूजरला सारखे फोनमध्ये पाहण्याची गरज नाहीये. या युजरला चालताना आवाजाने रस्ता सांगेल.
मागील महिन्यात गूगलने मॅपमध्ये लाइव्ह व्ह्यू नॅव्हीगेशन मोड जोडले होते, जे ऑग्मेंटेड रिअॅलिटीच्या साहाय्याने वॉकिंग डायरेक्शन सांगते. गूगल मॅपने या फीचरला बीटा टेस्टरसाठी रोल आउट करणे सुरू केले आहे. मॅपला यूजरसाठी अजून सोपे करण्यासाठी गूगल यात बाइक शेयरिंग स्टेशनचे फीचरदेखील जोडण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीने यूजरसा आसपास आसपास असलेल्या बाइक शेयरिंग सर्व्हिस स्टेशनची माहिती मिळेल.
 

बातम्या आणखी आहेत...