आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Incognito's New Feature Of Google Maps Won't Save Secure, Search Location History

गुगल मॅप्सचे नवे फीचर इन्काॅग्निटोमुळे माहिती सुरक्षित, सर्च लोकेशन हिस्ट्री सेव्ह होणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन : मोबाइल वापरकर्ते लोकेशन हिस्ट्री आणि शोधाच्या गोपनीयतेबाबत अस्वस्थ असतात. अनेक कंपन्या अशी माहिती इतरांना उपलब्ध करून देत असतात. ही अडचण पाहून गुगलने गुगल मॅप्समध्ये इनकॉग्निटो मोड मोडची सुविधा सुरू केली आहे. वापरकर्त्याची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यात ही सुविधा प्रभावी ठरेल. हा मोड सुरू केल्याने नेव्हिगेशन व सर्च हिस्ट्री, अकाउंटमध्ये सेव्ह होणार नाही तसेच हिस्ट्री रिकमेंडेशन सेक्शनमध्ये दिसणार नाही. वापरकर्ता आपले लोकेशन गुप्त ठेवू इच्छित असेल किंवा एखाद्याला न सांगता पत्ता शोधायचा असेल तर हे नवीन फीचर कामास येईल. सध्या हे फीचर फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. लवकरच आयओएसवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टेक क्रंचच्या माहितीनुसार इनकॉग्निटो फीचर माहिती गोळा करण्याचे अनेक बिंदू बंद करेल. ज्यात सर्च हिस्ट्री व लोकेशन हिस्ट्री यांचा समावेश अाहे. आधीपासून सेव्ह असलेल्या लोकेशन हिस्ट्रीवर मात्र परिणाम होणार नाही. गुगलच्या नवीन सुविधेचा वापर करण्यासाठी उजव्या कोपऱ्यातील अकाउंट आयकॉनवर क्लिक करत मोड सक्रिय करावा लागेल. यानंतर इनकॉग्निटो मोडला टर्न आॅन करावे लागेल.

इन्कॉग्निटो मोडमध्ये अॅपच्या काही सुविधा बंद राहतील
गुगलच्या माहितीनुसार वापरकर्त्याला नवीन मोडमध्ये लोकेशन हिस्ट्री, लोकेशन शेअरिंग, नोटिफिकेशन आणि मेसेज, सर्च हिस्ट्री, ऑफलाइन मॅप, युअर प्लेस, मीडिया इंटिग्रेशन, गुगल असिस्टंट मायक्रोफोन इन नेव्हिगेशनसारख्या सुविधांचा वापर करता येणार नाही.
 

बातम्या आणखी आहेत...