आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IT Department च्या योजनेत कोट्यधीश होण्याची संधी! भांडवलाचीही नाही गरज, करावे लागेल हे एक काम...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - जर तुम्हाला माहिती असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने काळा पैसा लपविण्याचा प्रयत्न केला किंवा बेनामी हस्तांतरण केले असेल तर याची माहिती तुम्ही सरकारला देऊन तुम्ही एक कोटीचे बक्षीस मिळवू शकता. सरकारने इन्कम टॅक्स विभागाला काळ्या पैशाची माहिती मिळावी आणि करचुकवेगिरीला आळा घालता यावा यासाठी बेनामी ट्रान्सझॅक्शन इन्फोमेट्स रिवार्ड स्कीम लॉन्च केली आहे.


सरकारने कडक केले कायदे
इन्कम टॅक्स विभागाने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, अनेक प्रकरणात दिसून आले आहे की, लोक काळा पैसा मालमत्तेत गुंतवत आहेत. त्यांनी टॅक्स रिटर्न भरताना ओनरशिपची ही माहिती लपवली आहे. सरकार याबाबतचे कायदे करड करणार आहे पण त्यापुर्वी सरकारने बेनामी प्रॉपर्टी ट्रान्सझॅक्शन अॅक्ट, 1988 ला बेनामी ट्रान्सझॅक्शन (प्रोबिशन) अमेंडमेट अॅक्ट 2016 च्या माध्यमातून संशोधित केला आहे.


काळ्या पैशाचा शोध घेण्यात वाढणार लोकसहभाग
इन्कम टॅक्स विभागाने काळ्या पैशाची माहिती समजण्यासाठी आणि टॅक्स चोरी रोखण्यासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी ही स्कीम लॉन्च केली आहे. यामुळे काळ्या पैसाचा शोध घेणे शक्य होणार आहे.


येथे मिळतील पूर्ण डिटेल्स
बेनामी ट्रान्सझॅक्शन इन्फॉर्मेट्स रिवार्ड स्कीम, 2018 अंतर्गत कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स विभागाच्या इन्वेस्टिगेशन डायरेक्टोरेटला बेनामी प्रोबिशन यूनिट्स (बीपीयू)च्या सह किंवा अतिरिक्त आयुक्तांना संबंधित माहिती देऊ शकतात. या रिवॉर्ड स्कीमसाठी परदेशी व्यक्तीही पात्र आहेत. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व पूर्ण गोपनीयता राखण्यात येईल. या योजनेची माहिती सगळ्या इन्कम टॅक्स ऑफिसेसमध्ये आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.


एका आणखी रिवार्ड स्कीममध्ये संशोधन
याशिवाय डिपार्टमेटने एक नवी रिवार्ड स्कीम ‘इन्कम टॅक्स इन्फॉर्मेट्स रिवार्ड स्कीम, 2018’ सुरु केली आहे. 2007 मधील रिवॉर्ड योजनेची या योजनेने जागा घेतली आहे. रिवॉर्ड स्कीम अंतर्गत इन्कम एसेट्सवर टॅक्स चोरीची माहिती देऊन ते 50 लाख रुपयांचे रिवॉर्ड मिळवू शकतात.

बातम्या आणखी आहेत...