आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत ड्राय फ्रूट्सच्या दुकानावर आयकर विभागाची धाड; तीनशे तिजोरींमधून कोट्यावधींची रोकड जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शहरातील चांदनी चौक परिसरात राजहंस सोप मिल्स लिमिटेड या कंपनीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. या कारवाईत जवळपास 100 तिजोरींमधून 25 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

 

ड्राय फ्रूट्सच्या दुकानाआड कर चुकवण्याचा प्रयत्न
5 नोव्हेंबरला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीती मिळताच त्यांनी ड्राय फ्रूट्स आणि साबनाची विक्री करणाऱ्या एका दुकानात धाड टाकली होती. अधिकाऱ्यांना या कारवाईत दुकानाच्या तळघरात जवळपास 300 खासगी तिजोऱ्या हाती लागल्या असुन या तिजोरीमधुन जवळपास 25 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना या तिजोरींच्या मालकांच्या तपास लागला असून अनेकांची चौकशी सुरू असल्याची माहीती आयकर विभागाने दिली आहे.  

बातम्या आणखी आहेत...