आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Income Tax Raid In Actor Vijays House, Money Recovered From The Financer Vijay , Says Source

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या घरी आयकर विभागाच्या धाडी, आयकर चोरीबद्दल अधिकाऱ्यांकडून विजयची कसून चौकशी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणतीही पूर्व कल्पना न देता अधिकारी पोहचले विजयच्या शूटींग सेटवर

चेन्नई- तमिळ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले. विजयवर आयकर चोरीचा आरोप आहे, त्यामुळेच आयकर विभागाने ही छापेमारी केली. विजयच्या घरावर धाड पडली त्यावेळी विजय तामिळनाडूतील नेयवली येथे त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये वस्त होता. पण या छापेमारीमुळे विजयला शूटिंग अर्धवट सोडून घरी परत यावे लागले. त्याआधी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी विजयच्या फायनान्सच्या घरातून खचाखच भरलेल्या पैशाच्या बॅग जप्त केल्या.

एजीएस एंटरप्रायजेस या कंपनीवरील छापेमारीदरम्यान, विजयला 'बिगील' या सिनेमासाठी दिलेल्या पैशांवरुन गडबड असल्याचे आढळले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, विजयला या सिनेमासाठी मोठी रक्कम मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागाचे विजयवर लक्ष होते. याप्रसंगी काल(बुधवार) आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. ही चौकशी सिनेमाशी निगडीत आयकरशी निगडीत होती.  आयकर अधिकारी एजीएस सिनेमा आणि सिनेमाचे निर्माते अंबू चेलियन यांच्या संपत्तीची चौकशी करणार आहेत. 'बिगील' या चित्रपटाने 300 कोटींहून अधिकची कमाई केली होती. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी सिनेमांमध्ये बिगिलचा समावेश आहे. ऐटली यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले. या सिनेमात विजयसोबत नयनतारा, जॅकी श्राॅफ, योगी बाबू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. अर्चना कल्पनाथी या सिनेमाच्या निर्मात्या होत्या.