आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Incoming Calls Must Ring For 30 Seconds On Mobile And 60 Seconds On Landline Trai

इनकमिंग कॉलमध्ये मोबाइलवर 30 आणि लँडलाइनवर 60 सेकंदापर्यंत रिंग वाजणे अनिवार्य- ट्राय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने आज(शुक्रवार) मोबाइल आणि लँडलाइनवर इनकमिंग कॉलदरम्यान रिंग वाजण्याची वेळ ठरवली आहे. ट्राइने स्पष्ट केले की, कॉल आल्यावर मोबाइल फोनवर 30 सेकंद आणि लँडलाइन फोनवर 60 सेकंदापर्यंत रिंग वाजलीच पाहीजे. जर ग्राहकाने फोन उचलला नाही, तरीदेखील रिंगटोन ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत वाजायलाच हवी.

लँडलाइन आणि मोबाइल फोनसाठी गुणवत्ता आणि सेवा नियमांमध्ये केलेल्या संशोधनानंतर ट्राइने सांगितले की, "व्हॉइस कॉल आल्यावर जर ग्राहकाने फोन कट केला नाही किंवा फोनचे उत्तर दिले नाही, तर अशा परिस्थितीत अलर्टची वेळ मोबाईलसाठी 30 सेकंद आणि लँडलाइनसाठी 60 सेकंदांची असेल."

जिओ आणि एअरटेल-आयडियामध्ये वाद
 
रिलायंस जिओने भारती-एअरटेल आणि वोडाफोन-आयडियासारख्या जुन्या ऑपरेटर्सवर चुकीच्या पद्धतीने लँडलाइन नंबर्सना मोबाइल फोन नंबर्स असल्याचे दाखवत मोठा लाभ मिळवल्याचे सांगितले. तसेच, जिओने ट्रायकडून लायसेंसचे नियम आणि सध्याचे नियम तोडल्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावण्याची अपील केली. भारती-एअरटेलने पलटवार करत जिओवर ट्रायला भ्रमित करण्याचा आरोप लावला. भारती-एअरटेलने सांगितले की, "कॉल कनेक्ट चार्ज(इंटरकनेक्ट उपयोग चार्ज)लागून होण्यापूर्वीच जिओने असे केले. दरम्यान, ट्रायच्या या नव्या नियमांचे आता सर्वच कंपन्यांना पालन करावे लागणार आहे. या नव्या नियमामुळे ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल.

बातम्या आणखी आहेत...