Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | tips to increase calcium in body

हे Super Food भरून काढतील शरीरातील कॅल्शियमची कमतरता  

रिलिजन डेस्क, | Update - Jul 05, 2019, 12:10 AM IST

बहुतांश हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड रुपात खाणे लाभदायक ठरते.

 • tips to increase calcium in body

  आधुनिक लाइफस्टाइल आणि शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता ही एक सामान्य समस्या होत चालली आहे. शरीरासाठी नैसर्गिक रुपात प्राप्त कॅल्शियमच उत्तम राहते. यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांविषयी सांगत आहोत, जे नियमित खाल्ल्यास कॅल्शियमची कधीही कमतरता भासणार नाही.


  पालेभाज्या
  बहुतांश हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड रुपात खाणे लाभदायक ठरते.


  शेंगभाज्या
  शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम प्राप्त होते.


  दुध
  दुध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधातून मिळणारे कॅल्शियम शरीर सहजपणे पचवते. यामुळे दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शरीरात कॅल्शियम वाढवणारे इतर काही खास उपाय...

 • tips to increase calcium in body

  दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दह्यामध्ये 400 मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. वसा रहित दही शरीरासाठी जास्त लाभदायक राहते. दह्या व्यतिरिक्त दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅल्शियम प्राप्त केले जाऊ शकते.


  तुळस आणि मसाले - तुळस, ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट देतात, तर याच्या सेवनाने कॅल्शियमसुद्धा प्राप्त होते.

 • tips to increase calcium in body

  संत्री आणि लिंबू - संत्री आणि लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मनाडत करते.


  सोयाबीन अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहार आहे. यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे. सोयाबीनमध्ये एस्ट्रोजन असते, जे बोन डेन्सिटीसाठी खूप आवश्यक आहे. याच्या नियमित सेवनाने व्यक्ती दिवसभर उर्जावान राहतो.

 • tips to increase calcium in body

  गुळ - कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की, गुळ आणि कॅल्शियमचा काय संबंध आहे. परंतु हे शंभर टक्के सत्य आहे की, गुळामध्ये भरपूर प्रमाणत कॅल्शियमचे असते. परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळामध्ये कॅल्शियमसोबतच फोस्फोरससुद्धा असते. जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यात सहायक ठरते.


  अंजीर - अंजीर हे सुकामेव्यात टेस्ट असण्यासोबतच अनेक गुणांनी युक्त असते. यामध्ये कॅल्शियम आणि आयरन अधिक प्रमाणात असते. सोबतच फायबरसुध्दा असते.

Trending