आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रमधील घटनेनंतर गडचिरोलीतील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीश आत्राम - Divya Marathi
गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीश आत्राम

नागपूर- आंध्र प्रदेशात नक्षलवाद्यांनी केलेल्या सत्तारूढ तेलुगु देसम आमदारांच्या हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीश आत्राम, खासदार अशोक नेते यांच्यासह आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. 


गेल्याच आठवड्यात आंध्र प्रदेशात सत्तारूढ तेलुगु देसमच्या दोन आजी आणि माजी आमदारांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीश आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी याला दुजोरा दिला आहे. 


या घटनेनंतर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालकांसह अन्य वरिष्ठ अधिकारी गडचिरोलीत दाखल झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने विविध राज्यांत कार्यरत नक्षल दलमना याबाबत जारी केलेले संदेश सुरक्षा यंत्रणांना मिळाल्याने गृह मंत्रालयाने नेत्यांची सुरक्षा वाढवण्यासह खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना नक्षलप्रभावित राज्यांना दिल्या आहेत. सध्या गडचिरोलीत सूरजागड लोह प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच तापला असून नक्षलवाद्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. अलीकडेच राज्य सरकारने या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी ५२५ पोलिसांचा ताफा तैनात करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाविरोधात नक्षलवाद्यांनी सरकारला विरोध करण्याचे बॅनर्स विविध भागांत झळकवले आहेत. त्यामुळे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नक्षलवादी कोणत्याही थराला जाऊ शकतात, या कारणास्तव पोलिस यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेबाबत लोकप्रतिनिधींनाही काही सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...