आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- रफालसह इतर अनेक मुद्द्यांवर १३ दिवसांपासून ठप्प राहिलेल्या राज्यसभेत गुरूवारी कामकाज झाले. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आला. चर्चेची सुरूवात काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते म्हणाले, मोदी सरकारने गत साडेचार वर्षांत राज्याला अस्थिर केले. मुस्लिमबहुल असूनही राज्याने भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला. काश्मीरी पंडितांशिवाय काश्मीर अपूर्ण आहे. त्यावर अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाहीसोबत काँग्रेसने प्रचंड खेळ केला. काेणत्याही पक्षाने तेवढा केला नसावा. 'ब्लेम गेम' मध्ये काँग्रेसचे प्रचंड नुकसान होईल. काश्मीरबद्दलचे नेहरुंचे धोरण व शामा प्रसाद मुखर्जी यापैकी कोणाचे धोरण चांगले होते ? याचे उत्तर इतिहास देऊ शकेल, असे जेटलींनी सुनावले.
इतिहासावरून दोन्ही नेत्यांत सभागृहात खडाजंगी
-आझाद म्हणाले- मनमोहन सरकारने काश्मीरमध्ये अनेक कार्यक्रम सुरू केले होते. अटलजींच्या कार्यकाळात काश्मीर समस्या सोडवण्यासाठी व्यापक प्रयत्न केले गेले. तेव्हा त्यांच्या पक्षाने अटलजींना साथ दिली असती तर काश्मीरची समस्या आतापर्यंत सोडवण्यात यश मिळाले असते.
-काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चेपूर्वी त्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. इतिहास जाणून घेतला जात नाही. तोपर्यंत अशी सरकारने चुका करतील.
-काश्मीरचा इतिहास माहित नसलेले सरकार सत्तेवर आले होते. १९४६ पासून काश्मीरमध्ये टू-नेशन सिद्धांत हा सर्वात मोठा मुद्दा आहे. चार वर्षांत दहशतवाद वाढला आहे. चकमकीत सर्वाधिक शहरी लोक मारले गेले.
-जेटली म्हणाले- १९४७ च्या चुकीची जबाबदारी तुम्ही विद्यमान गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टाकत असाल तर ही गोष्ट इतिहासाची टिंगल करण्यासारखीच होईल.
-काश्मीरमध्ये स्वतंत्र अस्तित्त्वाची कल्पना करण्यात आली होती. ७० वर्षांत ती फुटीरवादासारखी वाढली. काँग्रेसने केलेल्या आश्वासनांची पूर्ततता झाली नाही. त्याची किंमत देशाला अनेक वर्षे भोगावी लागली.
-राज्यात फुटीरवाद व दहशतवादाच्या विरोधात आहे. या समस्यांचा मुकाबला करायचा असल्यास स्थानिक विरोधी पक्षांनी एकत्र यावे. २०१० मध्ये काश्मीरचे सुवर्णयुग होते, असे तुम्ही म्हणता. वास्तविक त्याच वर्षी राज्यात दगडफेकीला सुरूवात झाली होती.
-देशाला काँग्रेसच्या चुकांची किंमत मोजावी लागतेय; जेटलींचे उत्तर
रफालचे वादंग काँग्रेसमुळेच : स्वराज
रफाल सौद्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, या सौद्यावरून संपूर्ण देशात काहीही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे. म्हणूनच वादंग केवळ काँग्रेसच्या डोक्यात सुरू आहे. सभागृहात प्रश्नोत्तरादरम्यान आनंद शर्मा यांना त्यांनी हे उत्तर दिले.
पंतप्रधान मोदी दूर पळू लागलेत : राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, बहुदा पंतप्रधान नरेंद्र मोदी रफालच्या परीक्षेपासून दूर पळू लागले आहेत. से पंजाबमधील लव्हली विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकवू लागले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांना चार प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तर घ्यावे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.