आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमच्या जिवाला धोका, सुरक्षा वाढवा; ठाकरे सरकारमधील 'या' दोन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका पाहता, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी - विजय वडेट्टीवार
  • दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येनंतर आपल्या जीवाला धोका - जितेंद्र आव्हाड यांचा दावा

मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी जीवाला धोका असल्याचे सांगत आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. यामुळे आमच्या सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (5 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आपल्या जीवालाही धोका असल्याचा दावा जितेंद्र आव्हांनी केला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका पाहता, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.